Your Own Digital Platform

महिंद्राची एक्सयूव्ही 300 लाँच

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधून ग्राहकांसाठी एक जबरदस्त गाडी लाँच केली आहे. महिंद्राची प्रतिक्षेत असलेली एक्सयूव्ही 300 ही गाडी अखेर काल अधिकृतपणे लाँच करण्यात आली. या गाडीच्या फीचरची माहिती आधीच देण्यात आली होती. परंतु, अधिकृतपणे ती काल लाँच करण्यात आली. या गाडीची टक्कर फोर्ड, इकोस्पोर्ट, टाटा नेक्सान, मारुती सुझुकी व्हिटारा ब्रीझ या गाड्यांशी होईल.

महिंद्रा एक्सयूव्ही 300 या गाडीला सांगयोंग टिवोलीवर तयार करण्यात आले आहे. कारच्या डिझाइनमध्ये खूप सारे बदल करण्यात आले आहेत. ही गाडी सहा रंगात उपलब्ध करण्यात आली आहे. महिंद्राने नव्या एसयूव्हीमध्ये सुरक्षेसाठी एअरबॅग, एबीएस, फोल व्हील डिक्स ब्रेक दिले आहेत. तसेच स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये एअरबॅग्स, एबीएस, चार चाकात डिस्कब्रेक, पॉवर विंडो, एलईडी टेल लँप्स यासारखी फीचर्स दिली आहेत. यातील डब्ल्यू8 व्हेरियंटमध्ये पार्किंग सेन्सर, 17 इंचाचा डायमंड कट अप्लाय व्हिल्स, सनरुप, डुअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, 8 इंचाचा टच स्क्रीनसह 7 एअरबॅग्सचे फीचर देण्यात आले आहे.

कारमध्ये लेदर सिटे, ड्युअल टोन इंटिरिअर, अ‍ॅडजस्टेबल बूट फ्लोर, मल्टिपर्पज सेंटर कंसोल बॉक्स, मागे-पुढे कप होल्डर, फ्रंट स्टोरेज ट्रे, चारी दरवाजांवर बोटल होल्डरसारखी फीचर देण्यात आली आहेत. महागडी समजली जाणारी सब कॉम्पॅक्ट 4 मीटर एसयूव्ही सेगमेंटचे फीचर पहिल्यांदा दिली आहेत. 1.5 लीटरचे 4 सिलिंडर डिझल इंजिन. 3750 आरपीएमवर 115 बीएचपीचे पॉवर आणि 1500-2500 आरपीएमवर 300 एनएमचे टॉर्क जेनरेट तयार करते. या गाडीची किंमत 7 लाखांपासून 10 लाख 80 हजारांपर्यंत आहे.

एक्सयूवी 300 पेट्रोल

डब्ल्यू 4 - 7.90 लाख रु

डब्ल्य ू6 - 8.75 लाख रु

डब्ल्य ू8- 10.25 लाख रु

एक्सयूवी 300 डीजल

डब्ल्यू 4 - 8.49 लाख रु

डब्ल्य ू6 - 9.30 लाख रु

डब्ल्य ू8 - 10.80लाख रु