Your Own Digital Platform

डॉ. भुता कुटुंबीयांकडून कंपोनंट लॅब उभारणीसाठी ब्लड बँकेस 35,000 रुपये

धनादेश स्वीकारताना अध्यक्ष डॉ.बिपिन शहा, सेक्रेटरी डॉ. संतोष गांधी , संचालक ऋषीकेश राजवैद्य सोबत डॉ. प्रकाश भुता,डॉ.निनाद भुता,श्री. सुभाष भुता 

फलटण: स्व. कांतीलाल केवलचंद भुता यांचे स्मरणार्थ रू. 35,000 ची देणगी फलटण मेडिकल फौंडेशन ब्लड बँकेच्या कंपोनंट लॅब उभारणी साठी देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष डॉ.बिपिन शहा, सेक्रेटरी डॉ. संतोष गांधी , संचालक ऋषीकेश राजवैद्य सोबत डॉ. प्रकाश भुता,डॉ.निनाद भुता,श्री. सुभाष भुता उपस्थित होते.

या सत्पात्री दानाबद्दल डॉ.शहा यांनी भुता कुटुंबीयांचे आभार मानले.

कंपोनंट लॅब उभारणीची तयारी जोरात सुरू असून लौकरच कार्यान्वित होईल.25 वर्षाहून जास्त काळ 24 तास सेवा देत आलेल्या ब्लड बँकेचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून यामुळे ब्लड बँक अपग्रेडेट होईल . ही फलटण, माण, खंडाळा तालुक्यासाठी खास अभिमानाची गोष्ट होईल.