बीएसएनएलचा शानदार प्लॅन, दररोज मिळवा 40 जीबी डाटा

नवी दिल्ली: भारत संचार निगम लिमिटेडने आपला नवा ब्रॉडबँड प्लॅन लाँच केला आहे. 2 हजार 499 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 40 जीबी डाटा आणि तोदेखील तब्बल 100 मेगाबाईट प्रति सेकंद इतक्या वेगाने मिळणार आहे. याशिवाय यामध्ये अमर्यादित स्थानिक आणि एसटीडी कॉलींगची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. मात्र, केवळ एक महिनाच या प्लॅनची वैधता असून सर्व ग्राहकांसाठी हा प्लॅन उपलब्ध असणार आहे. जिओच्या गिगाफायबरला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने भारत फायबर योजना सुरू केली आहे, हा प्लॅन त्याचाच एक भाग आहे.

या प्लॅनमध्ये युजर्सना मोफत इमेल आयडी आणि 1 जीबी स्टोरेज मेलबॉक्सची जागा (स्पेस) मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना कॅशबॅक देखील मिळणार आहे. जे ग्राहक 6 महिन्यांसाठी किंवा एका वर्षासाठी हा प्लॅन खेरदी करतील त्यांना 25 टक्के कॅशबॅकही मिळेल. यासाठी सध्या 777 रुपये, 1277 रुपये, 3,999 रुपये आणि 5,999 रुपयांचे प्लॅन उपलब्ध आहेत. यामध्ये आता 2 हजार 499 रुपयांचा प्लॅनची देखील भर पडली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 40 जीबी डाटा मिळेल. मर्यादा संपल्यानंतर 2 एमबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरावं लागेल.

No comments

Powered by Blogger.