Your Own Digital Platform

रामराजेंच्या उपस्थितीत फलटण शहरात उद्या 9 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांची उदघाटने/भूमीपूजनेफलटण: फलटण नगर परिषद कार्यालयातील श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर सभागृह उद्घाटन आणि शहरातील विविध विकास कामांची उद्घाटने, भूमीपूजने शुक्रवार दि. 22 रोजी सायंकाळी 5.00 वाजता महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्व करण्यात येणार आहेत. समारंभाचे अध्यक्षस्थान आ. दिपकराव चव्हाण भूषविणार असून या समारंभास शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे यांनी केले आहे.

या समारंभास फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प.पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती अजय माळवे, शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिककार्य समिती सभापती असिफ मेटकरी, पाणी पुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापती सौ. ज्योत्स्ना अनिल शिरतोडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुवर्णा अमरसिंह खानविलकर, महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगर अभियंता पंढरीनाथ साठे, सर्व नगरसेवक/नगरसेविका या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

विशेष रस्ता अनुदान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधारणा विशेष रस्ता अनुदान, नगरोत्थान, दलितेतर, स्थानिक विकास निधी (आमदार फंड), 14 वा वित्त आयोग, प्रा. सोई सुविधा विशेष अनुदान, नगर परिषद निधी अंतर्गत सुमारे 9 कोटी रुपये खर्चाच्या 94 कामांचे भूमीपूजन/उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे.

शासनाच्या विविध योजना, स्थानिक विकास निधी आणि न.पा. फंडातून हाती घेण्यात येत असलेल्या या विकास कामाद्वारे शहरामधील विविध प्रा. सोयी सुविधांमध्ये भर घालण्यात येत असून प्रामुख्याने शहराच्या विविध भागात रस्ते तयार करणे, खुल्या जागेस संरक्षण भिंत बांधणे, रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण, वाचनालय इमारत बांधणे, शहरातील वाढती वाहतूक व वाहनांची संख्या विचारात घेवून अपघातांचे प्रमाण कमी करणेसाठी रिंगरोड ते डी.एड कॉलेज आणि बारामती रोड ते पंढरपूर रोड या रस्त्यावर रस्ता दुभाजक बांधून त्यामध्ये एलईडी फिक्चर्स बसविणेे आदी कामे हाती घेण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा सौ. निताताई मिलींद नेवसे यांनी सांगितले.

या कार्यक्रमांतर्गत 1) लाकडी चौक आणि माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे निवासस्थाना शेजारी होणार्‍या कार्यक्रमात क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते बाणगंगा नदीपर्यंतच्या बाह्यवळण रस्त्यास (रिंगरोड) श्रीमंत राजकुमार विजयसिंह उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर रोड असे नामकरण आणि डॉ. कृष्णचंद्र भोईटे घर ते दैठणकर घर ते निकम घरापर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आणि पी.एन.गाडगीळ शोरुम व श्री.छ. आदितीराजे भोसले उद्यान येथे महाराजा मंगल कार्यालय परिसरातील विविध रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, 2) डॉ. रसाळ लॅब शेजारी, लक्ष्मीनगर ते डॉ. त्रिपुटे घर ते जायका फास्टफूड ते भैरवनाथ पतसंस्था, डॉ. अडसुळ ते शिंदेघर रस्ता डांबरीकरण शुभारंभ, 3) थोरात बंगला हॉटेल रायगड शेजारी येथे स्वामी विवेकानंदनगर रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ, 4) दगडीपूल व बाहुली शाळा येथे दगडीपूल ते स्वामी समर्थ मंदिर ते सुतार पान शॉप रस्ता करणे आणि दगडीपूल ते रचना आपार्टमेंट रस्ता करणे आणि शाळा नं 5 येथील नागरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन, 5) शनिनगर, पाचबत्ती चौक येथे शनिनगर बगीचा जागेस संरक्षक भिंत बांधणे, माणकेश्वर मंदिर येथील बॉक्स पोल बांधणे, पाचबत्ती चौक पूल उद्घाटन 6) महादेव मंदिर, काळभैरव फर्निचर समोर आणि पाचबत्ती चौक येथे लवळे घर ते महादेव मंदिर रस्ता कारपेट करणे, दत्तमंदिर ते काळभैरव फर्निचर दुकानपर्यंत रस्ता करणे, 7) श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल नजिक आणि अजित दोशी घरासमोर रिंगरोड येथे सिटीसर्व्हे नं 3321, शिंगणापूर रोड ते एसटी स्टॅण्ड रोडला जोडणारा रस्ता करणे, अहिल्यादेवी होळकर चौक ते सचिन रणवरे घरापर्यंत आरसीसी गटर व फुटपाथ विकसीत करणे, 8) श्रीराम कारखाना परिसर बारामती - पंढरपूर रस्ता येथे बारामती नाका ते डिस्टीलरी रोडपर्यंत रस्ता करणे आणि रस्ता दुभाजक व विद्युत व्यवस्था करणे कामाचा शुभारंभ, 9) वैकुंठ स्मशानभूमी परिसर विकास कामाचा शुभारंभ, 10) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर समोर आयोजित कार्यक्रमात मंगळवार पेठ येथे वाचनालय इमारत बांधणे व विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ, 11) मेटकरी गल्ली, नगरसिंह चौक, कुंभारटेक येथे मेटकरी गल्ली ते लाटकर व्यासपीठ रस्ता व नगर परिषद नागरी सुुविधा केंद्राचे उद्घाटन.

यासर्व कार्यक्रमानंतर नगर परिषद कार्यालयातील श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर सभागृह उद्घाटन समारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व मान्यवरांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.