ना. जानकरांनी धनगर समाजाला फसवले ः दशरथ राऊत

बारामती लोकसभा लढवणार

दुधेबावी (निलेश सोनवलकर
)ः ना. महादेव जानकर यांना धनगर समाजाचे असल्यामुळेच स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून घटक पक्ष म्हणून मंत्री मंडळात पोहचवले. मात्र जानकर आता धनगर समाजाच्या विरोधात बोलत आहेत व आरक्षणाच्या विषयाला पूर्ण बगल देऊन सत्ता भोगण्यात व्यस्त असून त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली असल्याचे भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ राऊत यांनी सांगितले.

भारतीय प्रजा सुराज्य पक्ष आयोजित कोल्हापूर ते नागपूर प्रजा जागर यात्रा फलटण येथे पोहचली असता त्या प्रसंगी ते बोलत होते.

आपण आगामी लोकसभा निवडणूक बारामती मतदार संघातून लढवणार असून राज्यातील सर्वच जागांवर आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. सध्या महाराष्ट्रात जातीचे व धर्माचे राजकारण सुरु असून धर्म निरपेक्ष सत्ता आणणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या नावाखाली जातीचा नेता होऊन राजकारण करण्याचे काम सुरू आहे. आघाडी सरकार व भाजप सरकार या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजप सरकार कडून शेतकरी, बेरोजगारी याबद्दल कोणताही ठोस निर्णय झाला नाही. शिक्षण। संस्थाच्या माध्यमातून चूकीच्या खर्चाचे अहवाल पाठवून शिक्षण शुल्क समिती कडून दुप्पट फी घेतली जाते आहे. गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही लोकांच्या माध्यमातून प्रस्थापितांना डावलून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मतपेटीद्वारे सत्तेत सहभागी होणार आहे.

आज संपूर्ण देशात तसेच राज्यात सत्तेसाठी जाती धर्माच्या नावानं राजकारण चालू आहे. जातीय तेढ निर्माण करून आजवर एकत्र राहणार्‍या समाजाच विभाजन चालवल आहे .या संघर्षात सामान्य नागरिक नाहक बळी जात आहे. भांडवल शाही , घराणेशाही, झुंडशाही, छूपी हुकूमशाही, यामुळे संविधानात दिलेल्या लोकशाहीचे खांबच उखडले जात आहेत . मानव ही एकच जात मानून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूर ते नागपूर प्रजा जागर यात्रेचे आयोजन आम्ही केले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.