फलटण : सध्याच्या पिढीमध्ये प्रचंड प्रगल्भता आहे. विशेषकरुन ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. या हिर्यांना पैलू पाडण्याची गरज आहे, त्यामूळे जय हिंद मित्र मंडळाने सुरु केलेल्या वैचारीक व्यासपिठास विशेष महत्व आहे, यातून अनेक माण्यवरांचे विचार प्रेरणादायी बनून विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करतील असा विश्‍वास माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.

विडणी ता. फलटण येथील जय हिंद मित्र मंडळ यांच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 122 साव्या जयंती दिनी राजमाता छत्रपती सईबाई भोसले नाट्यकला गौरव पुरस्कार सिनेअभिनेत्री पल्लवी वैद्य यांना व नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक कृतज्ञता पुरस्कार पुणे व कोकण विभागाचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना व अण्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर प्रभाकर देशमुख, पल्लवी वैद्य, सौ. अनुराधा देशमुख, श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, नगरसेवीका मधुबाला भोसले, माजी सहाय्यक संचालक डॉ. विजयकुमार कोकणे, नगरसेवक सचिन सुर्यवंशी ( बेडके ), प्रसिध्द मालीका दिग्दर्शक केदार वैद्य, यशवंत बँकेचे व्हाईस चेअरमन नरेंद्र भोईटे, आर्ट आँफ लिव्हिंगचे डॉ. माधवराव पोळ, पंचायत समिती सदस्या सुशीला नाळे, सरपंच रुपाली अभंग आदी माण्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सध्याच्या मुलांमध्ये प्रचंड प्रगल्भता आहे. पालकांनी आपल्या मुलांबरोबर मित्र म्हणून संवाद साधायला हवा कारण मुले आणि मुली हि सर्वात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीमध्ये पुढील काळात वेळेची व पैशाची अधिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कारण हि गुंतवणूक चांगली केली तर सामाजात चांगली पिढी निर्माण होईल व अशी पिढी तयार होणे समाजासाठी गरजेचे आहे त्यामुळे अशी पिढी निर्माण करण्यासाठी पालकांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन करुन देशमुख म्हणाले की, 1982 साली आपण प्रशासकीय सेवेस सुरुवात केली. त्यापासून आजवरच्या कालखंडात आपण नेहमीच वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न केला आहे. माजी आमदार कै. कृष्णचंद्र भोईटे यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या व गेली पस्तीस वर्षे अव्याहतपणे सुरु असलेल्या या वैचारीक प्रबोधनाच्या व्यासपिठाच्या पुरस्कारांचे मानकरी होण्याची संधी आम्हास प्राप्त झाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो असेही प्रभाकर देशमुख यांनी आवर्जून नमूद केले.

कार्यक्रमात प्रारंभी विद्यार्थीनींनी स्वागत गीत गायल्यानंतर माण्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्तविक मंगेश अभंग यांनी, सुत्रसंचलन ज्ञानेश्‍वर जगताप यांनी केले. आभार विश्‍वास घनवट यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

No comments

Powered by Blogger.