तर..धनगर समाजाने नोटाला मतदान करावे ः काशिनाथ सोनवलकर

फलटण ः गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात अनेक पक्षांचे सरकार आले मात्र त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले नाही व यावेळी भाजपचे सरकार सत्तेत येऊन पाच वर्षे पूर्ण होत आलीत मात्र त्यांनी ही आरक्षणाची शिफारस अजूनही पाठवली नाही मात्र येणार्‍या लोकसभा निवडणूकी अगोदर धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास समाजबांधवांनी नोटाला (नकारात्मक) मतदान करावे असे आवाहन धनगर समाजाचे नेते व समाजसेवक काशिनाथ सोनवलकर यांनी केले आहे.

धनगर समाज राज्यात लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर असून त्या प्रमाणात सत्तेत राजकीय वाटा राजकीय पक्ष देताना दिसत नाही. व गेली अनेक वर्षे असलेली आरक्षणाच्या शिफारशी ची मागणी आमचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या कँबिनेटमध्ये देऊ असे सांगणारे सरकार कोणतेही ठोस भूमिका घेत नाही .त्यामुळे या निवडणुकीत धनगर समाजाने आपल्या भूमिकेवर ठाम राहून नोटाला (नकारात्मक) मतदान करावे व आपल्या समाजाची किमंत दाखवून द्यावी असेही सोनवलकर यांनी सांगितले आहे.

No comments

Powered by Blogger.