राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शानभाग विद्यालयाचा मुलींचा संघ तृतीय
सातारा : कै. संतोष किसन जकाते यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये के. एस. डी. शानभाग विद्यालय व ज्यु. कॉलेज सातारच्या 17 वर्षाच्या खालील मुलींच्या संघास तृतीय क्रमांक मिळाला. नुकत्याच झालेल्या मुलींच्या 17 वर्षाखालील संघास कांस्य पदक पटकावले. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात शानभाग विद्यालयाने लोणंद संघास 2-0 असे पराभूत केले. संघाची कर्णधार निकिता देशमुख व उपकर्णधार श्‍वेता खामकर आहेत. या स्पर्धेमध्ये बेस्ट हाफ खेळाडू अंवति आवले, द बेस्ट फोरवड श्रेया हांडे ठरल्या अपकमिंग खेळाडू म्हणून स्वाती कदम व श्रावणी गोरे ठरले.

या संघातील साक्षी चौधरी, अंकिता कुंभार, विभुती घाडगे, कोमल शेखावत, चैत्राली राजेमहाडीक, श्रेया निकम, श्रृतिका नलवडे, श्रध्दा मगर, शिवांजली वीर, वैष्णवी चव्हाण, वर्षा शेडगे, रक्षा कदम, सृष्टी देशमुख यांनी सुरखे खेळ करुन हे यश मिळवले. संघाचे प्रशिक्षक सागर कारंडे व अनिकेत अडागळे आहेत. शाळेचे संस्थापक रमेश शानभाग, संचालिका सौ. आँचल घोरपडे, मुख्याध्यापिका रेखा गायकवाड व मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांनी संघाचे अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.