श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यालयात डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन
फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यालय, फलटण येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सचिन सूर्यवंशी बेडके, नियामक मंडळ सदस्य चंद्रकांत पवार, पटवर्धन तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी, पालक मोठ्या संयेने उपस्थित होते.
काळाजी गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडविण्यासाठी संस्थाचालकांनी शाळेत ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी केलेल्या या उपक्रमाचे पालकवर्गातून कौतुक करण्यात आले.
Post a Comment