Your Own Digital Platform

सातारकरांना सोबत घेऊन गुन्हेगारीचा समूळ नायनाट करणार : श्रीमती सातपुते

स्थैर्य, सातारा : आपला सातार्‍यात जास्तीत जास्त सुरक्षित वातावरण कसे राहील यासाठी आपल्या सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. तसेच पोलीस आणि नागरिकांना सोबत घेऊन समूळ गुन्हेगारीचा नायनाट करणार असल्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी या वेळी सांगितले.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पोलीस उपायुक्त पुणे शहरच्या श्रीमती तेजस्वी सातपुते यांची सातारच्या नव्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीमती तेजस्वी सातपुते म्हणाल्या, सातारा सारख्या एतिहासिक ठिकाणी माझी पोस्टिंग झाली आहे मला याचा आनंद वाटतोय या शहराबद्द्ल खूप वाचलेलं आहे ऐकलेलं आहे. सातारा सुंदर आणि समृद्ध शहर असून माझ्या आधी ज्या अधिकार्‍यांनी जे चांगले काम केले आहेत. ते काम तसेच पुढे सुरु ठेवणे माझे कर्त्यव्य आहे. माझे सातारकरांना आवाहन आहे आपला सातार्‍यात जास्तीत जास्त सुरक्षित वातावरण कसे राहील यासाठी प्रयत्न करूयात तसेच पोलीस आणि नागरिकांना सोबत घेऊन समूळ गुन्हेगारीचा नायनाट करणार असल्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी या वेळी सांगितले.

श्रीमती सातपुते यांनी हेंद्राबाद येथे ट्रेनींग घेऊन नाशिक येथे पोलीस उपधीक्षक म्हणून कामाची सुरवात केली त्यानंतर जळगाव, जालना, सीआयडी पुणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस उपधीक्षक पुणे उपायुक्त शहर म्हणून काम करताना श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी पुणे येथे गाडी चालवताना सुरक्षतेसाठी हेल्मेट किती उपयुक्त आहे, हे पुणे शहरातील नागरीकांना पटवून देऊन विशेष मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. तसेच भीमा कोरेगाव व चाकण प्रकरण त्यांनी यशस्वीपणे हाताळली होती. त्या काम करताना लोकांचे प्रश्न काय आहेत, याची माहीत घेऊनच त्यावर निर्णय घेतात. सातारा शहरातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशाच सक्षम अधिकार्‍याची गरज आहे. मीरा बोरवणकर मॅडम नंतर सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक पदी श्रीमती तेजस्वी सातपुते यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे सातारकरांमधून स्वागत केले जात आहे.