पुणे-बंगळुर हायवेवर कार-दुचाकी अपघात


सातारा: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजसमोर कारने दुचाकीला ठोकर दिल्यानंतर कार व दुचाकी कॉलेजमधील दोन विद्यार्थिनींच्या अंगावर कार जावून भीषण अपघात झाला.

यामध्ये विद्यार्थिनीसह एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतीश किसन यादव (वय 45 रा. लाडेगाव, ता. खटाव), उत्तम महादेव लवळे (वय 56, रा. संभाजीनगर सातारा) अशी दुचाकीवरील जखमींची नावे आहेत. सायली संजय इथापे (वय 19, रा. चिंधवली) व प्राजक्ता जगताप (वय 19, रा. शेंदूरजणे, ता. वाई) अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. यातील सतीश व सायली हे दोघे गंभीर जखमी झालेले आहेत.घटनास्थळावरून व सिव्हील रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, साताराकडून वाईकडे स्विफ्ट कार (क्र. एमएच 11 सीएल 3432) ही निघाली होती. कार महामार्गावरील गौरीशंकर कॉलेजसमोर आल्यानंतर कारने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. या दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेही हवेत उडाले. त्यातील एकजण दुचाकीमध्ये अडकला व दुसरा कारच्या बॉनेटवर आपटला.

No comments

Powered by Blogger.