Your Own Digital Platform

बारावीची बैठक व्यवस्था जाहीर
मुधोजी हायस्कूल

स्थैर्य, फलटण
: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापुर विभागीय मंडळातर्फे फेब्रु / मार्च 2019 मध्ये होणार्‍या परीक्षेसाठी इयत्ता 12 वी ची मुधोजी हायस्कूल फलटण (विज्ञान शाखा) 0101 येथील कला शाखेची परीक्षा बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.

एचएससी परीक्षा केंद्र क्रमांक - 102 मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे होणार्‍या परीक्षेसाठी बैठक व्यवस्था क्रमांक एक्स010900 पासून क्रमांक एक्स 011996 पर्यंत असणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा गुरूवार दिनांक 21 फेब्रुवारी 2019 ते शनिवार दिनांक 16 मार्च 2019 या दरम्यान घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थाया केंद्रात पहावी, असे आवाहन केंद्र प्रमुख एम. के. फडतरे व प्राचार्य ए. के. रुपनवर यांनी केले आहे.

विद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्रिका (रिसीट), ओळखपत्र व लेखन साहित्य घेउन शालेय गणवेशात वेळेपुर्वी अर्धा तास उपस्थित रहावे. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाईल आणू नये. विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेती शाळा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापुर विभागीय मंडळातर्फे फेब्रु / मार्च 2019 मध्ये होणार्‍या परीक्षेसाठी इयत्ता 12 वी ची मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील कला शाखेची परीक्षा बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.

एचएससी परीक्षा केंद्र क्रमांक - 102 मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे होणार्या परीक्षेसाठी बैठक व्यवस्था क्रमांक द061242 पासून क्रमांक द061748 पर्यंत असणाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा गुरूवार दिनांक 21 फेब्रुवारी 2019 ते शनिवार दिनांक 16 मार्च 2019 या दरम्यान घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्था सदरच्या केंद्रात पहावी, असे आवाहन केंद्र संचालक शिंदे आर आर यांनी केले आहे.

स्पीकर बंदीची मागणी


दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा जवळ आल्या आहेत. फलटणमध्ये दरररोज सुरु असणार्‍या रिक्षामधून स्पीकर सुरु असतो. यामुळे होणार्‍या ध्वनीप्रदुषणामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. किमान परीक्षेच्या कालावधीत रिक्षा तसेच इतर स्पीकरवर बंदी ठेवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरु होत आहे. या महत्वाच्या परीक्षांसाठी विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. स्पीकर व ध्वनी प्रदुषणामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. गावागावात फिरणार्‍या रिक्षा त्वरित बंद कराव्यात. अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.