मराठा बिझनेस फोरम आयोजित सेमिनारला सातार्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद.
सातारा: येथील शाहूकला मंदिर येथे मराठा बिझनेस फोरम यांच्यावतीने महाराष्ट्रातील मुलांचे प्रमाण एन.डी.ए. मध्ये वाढावे यासाठी मेजर जनरल विजय पवार (रिटायर्ड) यांच्या मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन केले होते. त्याला सातारा जिल्हयातीलच नव्हे तर सांगली, कोल्हापूर जिल्हयातील विद्याथर्यांनी हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी शाहूकलामंदिर तुडुंब तर भरले होतेच परंतु शाहूकलांमंदिरांच्या बाहेर उभे राहून अनेकांनी त्यांचे मार्गदर्शन ऐकले.

कंग्राळकर चॅरिटेबल ट्रस्ट, दिशा अ‍ॅकॅडमी, वाई, आणि आय कॅन ट्रेनिंग इन्सिटटयुट हे या सेमिनारचे प्रायोजक होते. यावेळी मराठा बिझनेस फोरमचे ग्लाोबल प्रेसिडेंट अरुणराव पवार, अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष सुरेंद्र काकडे, सेक्रेटरी आर.एस.साबळे, नवनाथ देशमुख, सयाजी भोसले, भगवान कदम, जीवन कापले, जगदीश शिर्के, अमोल अहिरे, संजय निकम, मराठा बिझनेस फोरमचे लाईफ मेंबर हेमंत बर्गे, रवींद्र चव्हाण, युवराज पवार, राजेंद्र चोरगे, शहाजी क्षीरसागर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी साता-यासह आसपासच्या जिल्हयातून 1200 ते 1500 विद्याथर्यांनी हजेरी लावली. त्यात आठवी ते दहावीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मेजर जनरल विजय पवार (रिटायर्ड) यांनी सैन्यामधील संधी, सुविधा व सैन्यामध्ये अधिकारी म्हणून जाण्यासाठी कशाप्रकारे तयारी करावी याबद्दल सखोल माहिती दिली. सैन्यात प्रवेशासाठी एन.डी.ए. आणि एस.पी.आय. इन्सिटटयुटचे कार्य कसे चालते याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अरुणराव पवार यांनी केले. सूत्रसंचालन सुरेंद्र काकडे यांनी केले.

सेमिनार अतिशय सैनिकी शिस्तीने झाला. अशाप्रकारच्या सेमिनारचे आयोजन पुन्हा करण्यात यावे अशी मागणी यावेळी बहुसंख्य पालकांनी केली. साता-यात सैन्यात अधिकार होण्यासाठी अशा प्रकारचा सेमिनार दिशा देणारा ठरेल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. सेमिनारसाठी सातारा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नगर, सांगली, नांदेड अशा विविध जिल्हयातून विद्यार्थी उपस्थित होते. सर्व शाळांनी सेमिनारसाठी विद्याथर्यांना पाठवून सहकार्य केल्याबद्दल सर्व शिक्षण संस्थांचे संयोजकांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.