बाल महोत्सवातून सुजान व सुसंस्कृत पिढी घडेल:डॉ. गडीकर

सातारा:विभागीय बाल महोत्सवाच्या माध्यमातून बालकांचा समातोल सर्वांगीण विकासा बरोबर सुजान व सुसंस्कृत पिढी घडेल असा विश्‍वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी व्यक्त केला.

येथील श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात 7 व्या विभागीय बालमहोत्सवाचे अयोजन करण्यात आले आहे या बाल महोत्सावाचे उद्घाटन आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी महिला व बाल कल्याण विभागाचे उपायुक्त दिलीप हिवराळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वनीता गोरे, मनिषा बर्गे उपस्थित होते.

चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या माध्यमातून बालगृहातील मुला, मुलींमधील त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळणार तर आहेच यातून खिलाडी वृत्ती तसेच सांघीक भावना वाढणार आहे असे सांगून डॉ. गडीकर यांनी सर्व खेळाडूंना शेवटी शुभेच्छा दिल्या.

मुलानी नैर्सगिक जगावे. आयुष्यात खोटे बालू नये बाल महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन उपायुक्त दिलीप हिवराळे यांनी यावेळी केले.

या बाल महोत्सवास पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यातील बालगृहात दाखल असलेले मुला- मुलींचा सहभाग असणार आहे. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, धावणे, उंच उडी, लांब उडी, बुद्धीबळ, वक्तृत्व, कविता वाचन, निबंध, चित्रकला, शुद्ध लेखन, हस्ताक्षर, वैयक्तिक नृत्य, सामुहिक नृत्य, सामुहिक गीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास महिला व बाल विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच बालगृहातील मुलं-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.