Your Own Digital Platform

कराड उत्तर मध्ये अपक्ष लढा: आमदार जयकुमार गोरे
कराड: राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी ची आघाडी होत असताना जिल्हयात सुद्धा सत्तेमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे. जिल्हा परिषद सत्ता व विधानसभेला जिल्हयात चार जागा मिळाल्याच पाहिजेत . आणि नाही मिळाल्या तर कराड उत्तर मधून अपक्ष लढा दिला जाईल असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला .

दुर्गळवाडी ता कोरेगांव येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार व काँग्रेस कार्यकर्त्याच्यां मेळाव्यात ते बोलत होते . यावेळी उपाध्यक्ष शैलेश चव्हाण , संपतराव माने , जेष्ठ नेते शंकरराव पाटील , वर्धन अ‍ॅग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम, जिप सदस्य भिमराव पाटील , निवास थोरात पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब निकम , शुभांगी काकडे , हणमंतराव मोरे पाटील, प्रविण भोसले , निलेश माने , बबन शेडगे , विकास राऊत, महेश उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते

आ.गोरे म्हणाले , स्व यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणार्‍या कराड उत्तरच्या विद्यमान आमदारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सगळ्या संस्था घशात घातल्या परंतु त्यांचे विकासाचे स्वप्न पुर्ण करता आले नाही . माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिडशे कोटी रुपयांच्या विकास कामामुळे कराड उत्तर ची जनता काँग्रेसच्या पाठीमागे आहे . धैर्यशील कदम यांनी पक्षाकडे तिकीट मागावेच आणि नाही दिले तर अपक्ष लढाई करायची तयारी ठेवावी . यावेळी कोणी मदतीला येईल , कोण प्रचाराला येईल याची अपेक्षा न ठेवता स्वताच्या हिमतीवर व कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर निवडणूक जिंकून दाखवावी .

जिल्हाध्यक्ष रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणाले, जिल्हयात काँग्रेसची ताकद वाढत आहे . पक्षाला परत एकदा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना जिल्हयातील कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल. जातीयवादी पक्षांना सत्तेपासून रोखण्यासाठी आघाडी होत आहे . राज्यात आघाडी होताना जिल्हयातही राष्ट्रवादी पक्षाने आघाडी धर्म पाळावा. धैर्यशील कदम यांच्यासारखे लोकप्रतिनीधी कराड उत्तर मध्ये निवडून आले तर विकास होईल.

जि. प. सदस्य भिमराव पाटील म्हणाले, जिल्हयात सत्ता स्थाने नसल्यामुळे विकास कामे करताना अडचणी होत आहेत . कराड उत्तरच्या विकासासाठी आम्हाला हक्काचा आमदार मिळावा. जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निबांळकर यांनी लक्ष घालून कराड उत्तर मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी मिळवून दयावी.

प्रास्ताविक माजी उपसरपंच महिपती यादव यांनी केले सुत्रसंचालन दिपक साबळे तर आभार बाबासो म्हसकर यांनी मानले. यावेळी परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

उपस्थितांचा सत्कार वह्या देउन

यावेळी उपस्थितांचा सत्कार वह्या देऊन करण्यात आला. आमदार जयकुमार गोरे यांनी पुढिल पिढी सक्षम व्हावी म्हणत उपस्थित शालेय मुलांना वहया वाटप केल्या.

आमदार बाळासाहेब पाटील यांना कावीळ

आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर टिका करताना धैर्यशील कदम म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून कराड उत्तर मध्ये दिडशे कोटींची विकासकामे केली आहेत .परंतु विद्यमान आमदारांना काविळ झाल्यामुळे झालेली कामे दिसत नाहीत. हणबरवाडी- धनगरवाडी योजनेचे स्वप्न स्व यशवंतराव चव्हाण यांचे होते. परंतु यांच्या घरात तीस वर्ष आमदारकी असूनही हे स्वप्न पूर्ण करता आले नाही. निवडणूक लागली की यांना हणबरवाडी योजना आठवते. दशहतीतून सत्ता, सत्तेतून पैसा, आणि पैशातून परत सत्ता एवढेच चालले आहे.