Your Own Digital Platform

मी कोणत्याही तिकिटाची काळजी करत नाही: उदयनराजे

सातारा : ‘बसचं तिकीट आहे, पिक्चरचं पण आहे, राहिलं तर शेवटी पोस्टाचंही तिकीट आहेच की. त्यामुळे मी कोणत्याही तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी गुगली टाकून खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतले असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

मुंबईत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी सातारा मतदारसंघाचाही विषय चर्चेत आला. या चर्चेदरम्यान, सातारा जिल्ह्यातील पक्ष आमदारांचा विरोध उदयनराजेंच्या उमेदवारीला असल्याचा मुद्दा समोर आला. त्यानंतर प्रमुख नेत्यांनी सातार्‍यातील पक्ष आमदारांना विचारात घेऊनच उदयनराजेंना उमेदवारी देण्यात यावी, असे ठरविले. मुंबई बैठकीतील ही वार्ता जिल्ह्यात सर्वत्र पसरली.

त्यामुळे उदयनराजेंना तिसजयांदा पक्ष साताजयातून उमेदवारी देणार का ? अशीही चर्चा झडू लागली. त्यानंतर उदयनराजे यांनी ‘बसचं, पिक्चरचं, पोस्टांच तिकीट माझ्याकडं आहे. त्यामुळे मी तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी एकप्रकारे गुगली टाकून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

या पार्श्वभूमीवर साताजयातून राष्ट्रवादीची उमेदवारी उदयनराजेंनाच मिळेल, हे जवळपास निश्चित आहे; पण उदयनराजेही सतत भाजप, शिवसेनेतील पदाधिकारी, मंत्र्यांच्या भेटी घेताना दिसतात. दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साताजयात आल्यावर त्यांच्याबरोबर दिसतात. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा अंदाज भल्याभल्यांना आणखी आला नाही. आताही त्यांनी ही गुगली टाकून वेगळाच राजकीय डाव टाकला, हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांचा अंदाज वर्तविणे कोणालाही कधीच शक्य नसते, हेच पुन्हा एकदा दिसून येत आहे. यावर सोशल मीडियावरही चर्चा रंगायला लागली आहे.