Your Own Digital Platform

श्रीराज जगतापने मिळवला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन

कोळकी : फलटण येथील ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कुल मधील विद्यार्थी श्रीराज संदीप जगताप याने बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस चॅम्पियन स्पर्धेत चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन चा किताब मिळविला.

या स्पर्धेत देशपातळीवरील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. श्रीराज ने या स्पर्धेत 5 मिनिट इतक्या कमी वेळात 100 अचूक गणिते सोडविण्याचा विक्रम करण्यात यश संपादन केले. त्यास चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी बंगलोर येथे प्राप्त झाली.फलटण येथे सदर ट्रॉफीचे वितरण स्वराज्यरक्षक संभाजी महाराज पुतळाराणीसाहेब फेम पल्लवी वैद्य व श्रेयस जाधव पॉप सिंगर डायरेक्टर यांचे हस्ते करण्यात आले

या स्पर्धेसाठी त्याला सिद्धी अबकस यांचे तसेच वडील संदीप जगताप,आई सौ.पल्लवी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीराज च्या या यशाबद्दल सदगुरु व महाराजा उदयोग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, फलटण नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती सौ.मधुबाला भोसले, ब्रिलियंट अकॅडमी स्कुलचे सचिव रणजितसिंह भोसले ,प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले ,श्री.सदगुरु हरीबुवा महाराज ना. सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, तुषारभाई गांधी राजाराम फणसे , मृणालिनी भोसले, कल्पना जाधव सदगुरु व महाराजा उदयोग समूहाचे पदाधिकारी ,कर्मचारी व मित्रपरिवार नातेवाईक आदींनी अभिनंदन केले.