चारा छावणी सुरु करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा: खरीप हंगामात शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागात जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे. चारा टंचाई झाल्यामुळे चारा छावण्या उघडण्याची आवश्यकता असलेल्या महसूल मंडळाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने चारा छावणी सुरु करण्यासाठी संस्थांनी 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.

प्रति मोठ्या जनावरास प्रतिदिन रुपये 70/- व लहान जनावरास प्रतिदिन 35/- रुपये शासकीय अनुदान असणार आहे. सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुध खरेदी विक्री संघ, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था व इतर संस्थांनी अर्ज करावेत. तसेच दानशूर, सेवाभावी, गोरक्षण क्षेत्रामध्ये काम करणार्‍या अशासकीय संस्था स्वेच्छेने व शासनाचे कोणतेही अनुदान न घेता जनावरांच्या छावण्या सुरु करण्यास इच्छुक संस्थानीही अर्ज करावेत. अर्ज संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा कार्यालय, सातारा येथे संपर्क साधावा.

No comments

Powered by Blogger.