तिरकवाडीत आजपासुन गणेश फेस्टिवल
दुधेबावी : तिरकवाडी ता फलटण येथील जय हनुमान क्रिडा मंडळाच्या वतीने दि 2 फेब्रुवारी पासुन श्री गणेश फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आनंदराव सोनवलकर यांनी दिली .

आज दि 2 फेब्रुवारी रोजी हॉलीबॉल स्पर्धेने फेस्टिव्हल चा शुभारंभ होणार आहे. यावेळी आमदार दिपक चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, पोलीस निरीक्षक दगूभाई शेख, पत्रकार सुभाषराव सोनवलकर उपस्थित राहणार आहेत.

रविवार दि 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आनंदराव शितोळे अरविंद मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

दि 4 फेब्रुवारी रोजी चला माणूस घडवुया या विषयावर व्याख्यान. दि 5 फेब्रुवारी रोजी होम मिनिस्टर व हळदी कुंकू कार्यक्रम. दि 6 फेब्रुवारी रोजी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा. दि 7 फेब्रुवारी रोजी ऑर्केस्टा झंकार कोल्हापूर. दि 8 रोजी सकाळी हभप अमित धोटे यांचे कीर्तन आणी संध्याकाळी 5 ते 8 महाप्रसाद आणि भव्य मिरवणुक होणार आहे या भरगच्च कार्यक्रमास पंचक्रोशीतील लोकांना सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

No comments

Powered by Blogger.