Your Own Digital Platform

पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा सिनेउद्योगाचा निर्णय

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय फिल्मइंडस्ट्रीने एक ठराव करत पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (खऋढऊA) ने घोषणा केली आहे की पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केलं जाणार नाही. असोसिएशनचे अध्यक्ष सिनेनिर्माता अशोक पंडित यांनी ही माहिती दिली. यापूर्वी पाकिस्तानी प्रिमियर लीगच्या सामन्यांचे भारतातील प्रक्षेपण रोखण्याचा निर्णय घेत पाक क्रिकेट जगतालाही भारताने धक्का दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव येथील फिल्मसिटीमधील शूटिंग बंद ठेवण्यात आलं होतं. दुपारी येथे पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जवानांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

अशोक पंडित म्हणाले, ’फिल्म इंडस्ट्रीत लाखो लोक सुरक्षा दल आणि सरकारसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आमचे असोशिएशन खऋढऊAने निर्णय घेतला आहे की पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केलं जाणार नाही.’

या कार्यक्रमात सिनेउद्योगातील मंडळींसह वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, सुरेश रैना आणि मोहम्मद कैफ हे क्रिकेटपटूही उपस्थित होते.