Your Own Digital Platform

अजरामर गीतरामायण जनप्रिय आवृत्तीच्या प्रकाशनपुर्व नोंदणीचा शुभारंभ.

साताराः आधुनिक वाल्मिकी म्हणून गौरविले गेलेल्या महाकवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ संगीतकार गायक स्व.सुधीर फडके या दोघांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्या दोघांच्या प्रतिभेच्या आविष्कारातून गीतरामायण हा सांस्कृतिक ठेवा साकारला. आज 65 वर्षानंतरही मराठी मनावर याची मोहिनी पिढयानपिढया वर्धिष्णू आहे. 9 वर्षापुर्वी कौशिक प्रकाशनच्यावतीने अजरामर गीतरामायण हे पुस्तक प्रसिध्द झाले

आजवर त्याच्या 5 आवृत्त्या काढण्यात आल्या. बाबूजी व गदीमांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना भावांजली म्हणून हे 250 पानांचे पुस्तक प्रत्येक मराठी घरात पोहचावे या उदात्त हेतूने प्रकाशनने जनप्रिय आवृत्ती काही सदभावी संस्थांच्या सह्याने कमीत कमी किंमतीत उपलब्ध व्हावी अशी योजना आखली. येत्या रामनवमीला म्हणजेच 13 एप्रिल 2019 पुर्वी ही आवृत्ती प्रकाशित केली जाणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीचा शुभारंभ नुकताच सातारा येथे पुणे येथील ओंकार बेडेकर गणपती मंदिराचे प्रमुख व ज्येष्ठ संगीत समीक्षक गोविंदराव बेडेकर यांनी 51 प्रतींची नोंदणी करून केला. यावेळी ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर, एअर इंडियाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी उल्हास रानडे व कौशिक प्रकाशनचे अरूण गोडबोले उपस्थित होते.

यावेळी गोविंदराव बेडेकर यांनी हा अत्यंत चांगला उपक्रम असून हे गीतरामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अतिशय अल्प दरात ही आवृत्ती प्रकाशित होत आहे याचा आनंद वाटतो. नाममात्र 90 रूपयात हा ठेवा प्रत्येकाने आपल्या घरी आवर्जुन ठेवावा असाच आहे असे मनोगत व्यक्त करून कौशिक प्रकाशनच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

वायूदल अधिकारी उल्हास रानडे यांनी अरूण गोडबोले व त्यांचे कुटूंबियांनी कौशिक प्रकाशनच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून अनेक उपक्रम चार दशकाहून अधिक काळ सुरू ठेवले आहेत. याचा मोठा आनंद वाटतो व त्यांच्या कार्यास पुढील पिढीही साथ देत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो असे सांगितले.

कौशिक प्रकाशनचे अरूण गोडबोले यांनी ही जनप्रिय आवृत्ती नोंदणीसाठी 90 रूपयाचे मुल्य असलेली प्रकाशनपुर्व सवलतीची प्रत 18 मार्च 201 9 पुर्वी नोंद करावी यासाठी धनादेश, डिमांड ड्राफट, मनीऑडर्रने रक्कम पाठविल्यास हे पुस्तक प्रकाशनच्यावतीने खर्च करून रजिस्टर बुक पोस्ट अथवा कुरीअरने घरपोच पाठवले जाईल तसेच सदर रक्कम NEFT किंवा  RTGS  ने पाठविल्यासkaushik prakashan, IDBI Bank Satara S/B ­/C.No.45110010840671 IFSC: IBkL0000451 या खात्यावर पाठवावी व पावतीची झेरॉक्स पाठवावी. नोंदणी करताना आपले नाव, पत्ता, फोन, मोबाईल व ईमेल अवश्य कळवावा तसेच 50 किंवा जास्त प्रतींसाठी विशेष सवलत पाहिजे असल्यास मो.नं.9850943041 यावर सकाळी 10 ते 4 यावेळेत संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.