स्वयंसिद्धाने केली महिलांसाठी बाजारपेठ उपलब्ध:काळे

उदघाटन प्रसंगी पालवी काळे, सौ. मधुबाला भोसले व इतर

फलटण: फलटण सारख्या छोट्या शहरात स्वयंसिद्धाने महिलांचे संघटन करून महिलांच्या उन्नतीसाठी करत असलेले कार्य निश्‍चितच कौतुकास्पद असून स्वयंसिद्धा फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून महिलांसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक सौ. पालवी काळे यांनी केले.

स्वयंसिद्धा फूड फेस्टिव्हल च्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्वयंसिद्धा महिला संस्थासमूहाच्या अध्यक्षा सौ. मधुबाला भोसले होत्या. यावेळी नगरसेविका वैशालीताई चोरमले, सुवर्णा खानविलकर ,तसेच वैभवी भोसले यांची उपस्थिती होती.

सौ. काळे म्हणाल्या, निर्भया पथकाच्या माध्यमातून शहरातील तसेच तालुक्यातील बहुतांशी शाळांमधून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देत आहोत, मुलींच्या मनातील भीती कमी करून त्यांच्यात जागृती व अन्याबाबत प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचे कार्य निर्भया पथकाच्या मार्फत होते. अपशब्द, छेडछाड असे प्रकार घडल्यास मुलींनी त्याचा प्रतिकार करून पालकांशी, निर्भया पथकाशी संपर्क साधावा असे आवाहनही सौ. काळे यांनी या प्रसंगी केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ. भोसले म्हणाल्या, स्वयंसिद्धा वतीने वर्षभर राबविण्यात येणार्‍या उपक्रमांना फलटणकर नेहमीच उत्स्फुर्त प्रतिसाद देत असतात. फलटणकर खवय्यांच्या पसंतीस हे फूड फेस्टिव्हल उतरले असून या माध्यमातून महिलांच्यात नवनिर्मितीची भावना निर्माण होत आहे.

स्वयंसिद्धा च्या उपाध्यक्षा सौ. श्रद्धा कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले.

No comments

Powered by Blogger.