Your Own Digital Platform

जिल्हा बँकेमुळे आर्थिक जीवनमान उंचावले: निंबाळकर

आदर्की बु॥ जिल्हा बॅक शाखेच्या वतीने फॉकलन वितरण प्रसंगी विश्वासराव निंबाळकर, व्हि. बी. गायकवाड, सतिश बिचकले आदी 

आदर्की : सातारा जिल्हा बॅकेमार्फत शेतकरी , बेरोजगार तरुणांना विविध योजने अर्तगत अर्थसाहय केल्याने त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावल्याचे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक विश्वासराव निंबाळकर यांनी सांगितले.

आदर्की बु येथिल सातारा जिल्हा बॅकेच्या शाखे मार्फत आदर्की खुर्द येथिल सतिष कोंडीबा बिचकुले यांना कंपोजीट लोन न 3 मधून फॉकलन मशिन वाटप प्रसंगी निंबाळकर बोलत होते

यावेळी विभागीय विकास अधिकारी ए .पी. खलाटे, विकास अधिकारी व्ही .बी. गायकवाड, राजेंद्र फडतरे, बाबा बरकडे, शाखाप्रमुख बी .एच . घनवट , जयदिप भोईटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.