वाई येथे कृष्णातीरी त्रिवेणी साहित्यसंगम कार्यक्रमाचे आयोजन

सातारा:- स्व. पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शासनामार्फत महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाने या जन्मशताब्दीनिमित्त 9 व 10 फेब्रुवारी 2019 रोजी द्रविड हायस्कूल, वाई येथे कृष्णातिरी त्रिवेणी साहित्य संगम या साहित्य, सांस्कृतिक व संगीतविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कृष्णातिरी त्रिवेणी साहित्यसंगम कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आमदार मकरंद पाटील, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आदी उपस्थित राहणार आहेत. दि.9 व 10 फेब्रुवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.