Your Own Digital Platform

रविंद्र देशमुख यांच्यावतीने वाढदिवसानिमित्त डस्टबिन वाटप


स्थैर्य, फलटण : कोळकी येथील रविंद्र सिटी मॉलचे प्रोप्रायटर रविंद्र देशमुख यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त फलटण शहरातील व कोळकी गावातील महिलांना ङस्टबिन वाटप करुन एक वेगळाच पायंङा घालून दिला. आजकाल वाढदिवस म्हंटले की फटाक्यांची आतषबाजी, पार्टी, केक तोंङाला अंगाला, लावणे. आदी प्रकार सर्रास दिसतात माञ येथील फुटबॉल प्लेयर रविंद्र देशमुख यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण च्या पार्श्‍वभूमीवर फलटण शहरातील महिलांना ङस्टबिन वाटप करुन वाढदिवस साजरा केला.धांगङधिंगाणा घालणार्‍या पुढे वेगळाच पायंङा घालून दिला आहे. या ङस्टबिन चे वाटप फलटण नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती अजय माळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे पै. संजय देशमुख वैभव नाळे आदी उपस्थित होते.