‘लक्ष्मी सदैव मंगलम’मध्ये होणार केतकी चितळेची एण्ट्री

केतकी चितळे

कलर्स मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली लक्ष्मी सदैव मंगलम ही मालिका सध्या रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. सध्या या मालिकेच्या प्रत्येक भागात काही ना काही तरी नवी घटना घडत आहे. मल्हारच्या आयुष्यातून आर्वीचं अचानक निघून जाणं, तिच्या मृत्यूची बातमी येणं. या सार्‍यामुळे लक्ष्मी पार हादरुन गेली असून ती या धक्यातून बाहेर येत नाहीये. त्यातच आता या मालिकेत कुटुंबातील नव्या सदस्याची एण्ट्री होणार आहे.

अक्काची मैत्रिणीची मुलगी अबोली या मालिकेत येणार असून अबोलीची भूमिका अभिनेत्री केतकी चितळे साकारणार आहे. त्यामुळे या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. लक्ष्मी आणि मल्हारचं नात एका नाजूक वळणावर येऊन पोहोचले असून मल्हारच्या मनात लक्ष्मीबद्दल असलेलं प्रेम अक्कांना पहिल्यापासूनच माहिती आहे. मात्र, अजिंक्यला यातलं काही एक माहिती नाही.

अबोली घरामध्ये आल्यानंतर अजिंक्यला इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी घेणार आहे. हे होत असतानाच अजिंक्य आणि अबोलीची मैत्री देखील होणार असून दुसरीकडे मालिका रंजक वळणावर पोहचणार आहे कारण अबोली आणि मल्हार मध्ये देखील मैत्री होणार आहे.. आता मालिकेमध्ये अबोलीच्या येण्याने लक्ष्मी, मल्हार आणि अजिंक्यच्या आयुष्यात कोणते बदल होतील ? अबोलीच्या येण्याने मालिकेला कोणते नवे रंजक वळण मिळणार ? अबोलीचे घरात येणे लक्ष्मीसाठी चांगले असेल कि वाईट ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेव्हा नक्की बघा लक्ष्मी सदैव मंगलम् संध्या. 7.00 वा. फक्त कलर्स मराठीवर.

No comments

Powered by Blogger.