वडूजकरांची कचरामुक्तीकडे वाटचाल

नाथमंदिर परिससरतील सार्वजनिक अत्याधुनिक शौचालयांची पाहणी करताना नगराध्यक्ष डॉ.महेश गुरव, रुचिरा खंडांरे, वचन शहा, प्रदीप खुडे, अभय देशमुख व इतर.(छाया: सुयोग लंगडे)वडूज: स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत शहरातील स्वच्छते बरोबरच शहरात सार्वजनिक शौचालये अत्याधुनिक करण्यात आले आहे. भरपूर पाणी, विजेची सोय, अपंगासाठी रोलिंग रॅम्प, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वडूज शहर हागणदारीमुक्त झाले असून अत्याधुनिक सार्वजनिक शौचालयामुळे वडूज शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2019 या अभियानात आघाडी घेतली आहे. यामध्ये नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी नागरिक व नगराध्यक्ष, नगरसेवकांचे मोठे योगदान आहे.

शहर स्वच्छता समन्वयक रुचिरा खंडांरे नगराध्यक्ष डॉ़.महेश गुरव, बांधकाम सभापती वचन शहा, नगरसेवक प्रदीप खुडे, अभय देशमुख यांच्यासह नागरिक नूतन शौचालय पाहणी दरम्यान उपस्थित होते. आरोग्य, ड्रेनेज विभागातील अधिकारी, कर्मचारी दक्ष राहत असून काही महिन्यांपासून नगरपंचतीने स्वच्छ सर्वेक्षण आघाडी घेत शहर कुंडी मुक्त करण्याबरोबरच शहर कचरा डेपोमुक्त करण्यात आला आहे. स्वच्छतेबरोबर शहरातील नागरिककांकडे शौचालयांची व्यवस्था आहे का? सामुदायिक, सार्वजनिक शौचालये आहेत का? या बाबी ही स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अंतरभुत असल्याने शहरात सामुदायिकसह सार्वजनिक 39 शौचालये अत्याधुनिक सुविधांयुक्त करण्यात आली आहे. त्याच बरोबर शहरतील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये मधील स्वच्छता गृहे ही यानिमित्ताने स्वच्छ दिसू लागले आहे. स्वच्छता गृहमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थेसह डिस्पोजल मशीन ही बसविण्यात आले आहे. शौचालयांसाठी उत्साहनपर अनुदानापोटी 241 लाभार्थ्यांचे शौचालये नगरपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आली आहेत. यामध्ये शहरातील विविध ठिकाणी नऊ युनिट अत्याधुनिक शौचालये उभारून वडूज नगरपंचायतीने या अभियानात आघाडी घेतली आहे.

शहर ओडिएफप्लसप्लस होण्यासाठी वडूज नगरपंचायतीने कंबर कसली असून सार्वजनिक स्वच्छता गृहामधून बाहेर आल्यानंतर नागरिकांना आपल्या प्रतिक्रिया व सूचना देण्यासाठी एक सुचनापेटी ही ठेवण्यात आली आहे. त्याच बरोबरीने शहरातील स्वच्छता गृहे असलेल्या ठिकाणचे दिशादर्शक फलक लावण्यात आले असून यावर शौचालयांच्या नावासह किती अंतरावर आहे. याची नोंद ही फलकावर करण्यात आली आहे. तर शहरांमध्ये बाजार चौकात एक, नाथमंदिर परिसरात एक, कुंभारगल्लीत एक, इंदिरानगर व आदिनाथनगर मध्ये प्रत्येकी दोन, संजयनगर, दबडेवस्ती प्रत्येकी एक असे मिळून नऊ युनिट शौचालये अत्याधुनिक स्वरूपात उभारलेले आहे.

नागरिकांनी स्वच्छता गृहांचा वापर करण्याबरोबर स्वच्छता गृहांची काळजीही घेणे गरजेचे आहे. या सुविधा सर्वांसाठीच असल्याने त्याचा योग्य वापर करावा. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात सुविधा असताना कोनीही उघड्यावर शौचविधी करू नये. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेऊयात असे आवाहन यावेळी शहर स्वच्छता समन्वयक रुचिरा खंडांरे यांनी केले.

No comments

Powered by Blogger.