Your Own Digital Platform

आयडियल किडस इंटरनँशनल स्कुलचे आगळेवेगळे स्नेहसंमेलन उत्साहात

फलटण: येथील नामांकित आयडियल किडस इंटरनँशनल स्कुल मध्ये दोन सत्रात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. आपल्या वेगळेपणाची परपंरा कायम ठेवीत यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनलाची थिम आपल्या उत्सवप्रिय भारत देशाला अर्पित करुन इनक्रेडिबल इंडिया अशा नावाने साजरी करण्यात आली.

अतुल्य, अगम्य, अद्वैत भारत आपल्या या महान भारत मातेच्या संस्काराची, पंरपरेची अन संस्कृतीची अनमोल मुल्ये आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना अन रसिकांना व्हावी यांच धर्तीवर स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठाचे नेपथ्य, सजावटीकरण करण्यात आले होते.

आपलं गाव, आपला जिल्हा, आपला प्रदेश आणि आपला देश सर्वांनाच प्रिय असतो. आपण ज्या मातीत जन्मलो तिची महती आपणच सर्वदुर पसरावयाची हे मनात पक्के करुन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय वैशाली शिंदे मँम यांनी या इनक्रेडिबल इंडिया स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.

आयडियल किडस स्कुलची ओळख ही नव्या दमाची संस्कारक्षम शाळा म्हणुन आपण ऐकत असतो. आपल्या लौकिकाला आणि नावाला साजेसा देखणा कार्यक्रम पहायला विद्यार्थी, पालक यांच्यासहित परीसरातील रसिकांनी तोबा गर्दी केली होती.

पहिल्या सत्रामध्ये प्ले ग्रुप ते ज्युनियर केजी च्या मुलांचे स्नेहसंमेलन पार पडले. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी प्राचार्य श्री. रविंद्र येवले सर यांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

या सत्रामध्ये लहान मुलांनी आपल्या सुंदर अदाकाराने उपस्थितांची वाहवा मिळवली.

यामध्ये आपल्या देशाच्या वैविध्याचा मान राखुन मराठी, हिंदी, इंग्रजी गाण्यांवर मुलांनी आपली कला सादर केली.. महाराष्ट्र गीत, कोळी गीत, नर्सरी र्‍हाईम, स्कुल चले हम, अग्गोबाई ढग्गोबाई, बार्बी गर्ल, आय लव माय इंडिया यासारखी तब्बल सत्तावीस गाणी आणि ड्रामा सादर केला.

आयडियल किडस चा सरप्राईझ शो म्हणुन सुपर मॉम विथ किड हा महिला पालकांचा त्यांच्या मुलांसोबतचा फँशन शो सादर झाला. या शो मध्ये आपल्या मुलांसहित महिला पालकांनी जिजाऊ मांसाहेब आणि बाल शिवबा, झाशीची राणी, मर्‍हाटंमोळी शेतकरी तसेच पाश्चिमात्य वेशभूषा परिधान करुन आपल्या मुलांची अन घरच्या मंडळीची दाद मिळवली.

संध्याकाळच्या सत्रामध्ये सिनिअर केजी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन पार पडले. या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे येथील सिलिकॉन व्हँली च्या संचालक सौ. योगिता गायकवाड मँम यांची उपस्थीती लाभली. तसेच या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्षपद जेष्ठ नेते श्री. सुभाषभाऊ शिंदे यांनी भुषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. सुभाषभाऊ शिंदे यांनी शाळेचे कौतुक करताना आयडियल विद्यार्थी हा कसा आयडियल आहे याची स्वअनुभवाची शिदोरी विद्यार्थ्यांच्या समोर उघडली. तसेच शाळेचे अन संस्थापक अध्यक्षांचे कौतुक करताना आवर्जुन बिदाल ता. माण या सौ. वैशाली शिंदे मँम यांच्या माहेरगावचा उल्लेख, बुध्दीवंताची खाण असा केला.

या कार्यक्रमात देखील विद्यार्थ्यांनी इनक्रेडिबल इंडिया या थीमला अनुसरुन आपल्या कलागुणांचा अविष्कार सादर केला. यामध्ये सध्या गाजत असलेल्या नाळ चित्रपटातील आई मला खेळायला जाऊ दे नं वं आणि आला रे आला सिम्बा आला यावर सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण करुन वन्समोअर ची दाद मिळवली.

तसेच शैक्षणिक कव्वाली, स्वच्छ भारत अभियान यावर नाटिका, भांगडा, लावणी, देशभक्तीपर गीत यासहित एकुण पंचवीस गाण्यांच्या माध्यमातुन आपली कला सादर केली.

पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बिदाल गावचे सुपुत्र, सुप्रसिद्ध निवेदक श्री. हनुमंत जगदाळे सर आणि स्कुलच्या सेंटर हेड सौ. सुचिता जाधव मँम यांनी करुन कार्यक्रमाची शोभा वाढविली.

दुसर्‍या सत्रामध्ये चि. इशान मेनसे व चि. श्लोक जाधव यांनी कसलेल्या कलाकारांना पिछाढीस टाकेल असा परफॉर्मन्स करत संपुर्ण कार्यक्रमाचे हलके फुलके चिमटे काढत सुत्रसंचालन केले.. भारतातील काश्मीर पासुन कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास आपल्या सुत्रसंचालनातुन दाखवुन दिला.

कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक मंडळ, स्कुल कमिटी मेंबर, पत्रकार बांधव, सर्व विद्यार्थी, पालक तसेच परीसरातील रसिक उपस्थीत होते. कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडाचे रोप देऊन करण्यात आले. तसेच प्रत्येक पालकांचे स्वागत, त्यांचे आदरातिथ्य करण्याचे महत्त्वाचे काम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने केले.

या इनक्रेडिबल इंडिया वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रत्येक गाण्यांच्या अनुषंगाने स्टेजच्या मध्ये लावलेल्या डिजिटल एलईडीवर विविध चित्रे, चलचित्रे, कार्टुन्सचे मेमेज व गाण्याच्या वातावरण निर्मितीसाठी प्रॉपर्टीज म्हणुन झेंडे, होडी, मोठ्या तसबरी, कचरापेट्या आणि विविध प्रकारच्या वस्तुंची रेलचेल यांची मुख्य जबाबदारी इंव्हेट मँनेजर रोहिणी करवा यांनी पार पाडली.

तसेच स्टेजचे सजावटीकरण व विडियो शुटींगची जबाबदारी श्री फोटोज चे श्री. अशोक नाळे यांनी पार पाडली. साऊंड व लाईटची जबाबदारी श्री. मतिन तांबोळी यांनी निभावली.

आयडियल किडस इंटरनँशनल स्कुल च्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय वैशाली शिंदे मँम यांनी मुलांच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी स्नेहसंमेलनसह यावर्षी आयडियल ड्रामेबाज हा अनोखा शो फलटणकरांसाठी आयोजित केलेला होता. त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली शाळेचे सर्वच कार्यक्रम अतिशय नेटक्या नियोजनात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरे होतात.

स्वःता जातीने प्रत्येक विभागाचे सुनियोजित आराखडा तयार करुन त्यातील बारकाव्यांची देखणी मांडणी करुन आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रत्येक कार्यक्रम वेगळा देणार्‍या आदरणीय वैशाली शिंदे यांना यांना सलाम करावासा वाटतो.

आयडियल किडस इंटरनँशनल स्कुल च्या घोडदौडीस मनपुर्वक शुभेच्छा दिल्या.