Your Own Digital Platform

तिरस्काराचे नाही तर विकासाचे राजकारण करा: श्रीमंत रामराजे

स्थैर्य, फलटण : सध्या असणार्‍या युवा वर्गामध्ये तिरस्काराचे राजकारण सुरू आहे असे राजकारण न करता विकासाचे राजकारण करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आंदरूड ता.फलटण येथील आयोजित हुरडा पार्टीमध्ये केले.

हुरडा पार्टीच्या निमित्ताने एकत्र भेटता येत बोलता येते त्या मुळे दरवर्षी मी ही हुरडा पार्टीला येतो व येत राहीन. आपल्या भागात नवीन काही आणावे अशी माझी इच्छा आहे व ती इच्छा मी पूर्ण करणार याची मला खात्री आहे. माझ्या स्वभावामुळे विधान परिषदेमध्ये सत्ताधारी व विरोधक सगळेच माझ्या इथे येतात त्या मुळे बरेचशे प्रश्न सोडवता येतात. असही श्रीमंत रामराजे म्हणाले.

तरुण मुलांना अधिवेशनाला घेऊन या त्यांना कळुद्या की, फक्त आमदार दंगा करत नाहीत तसे दंगा करतो तो फक्त आमदार नाही तर कामकाज चालू देणारे पण आमदारच असतात तेही या तरुण मुलांना कळू द्या. आगमी काळात तरुण वर्गाने पुढे येणे गरजेचे असून दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. या सगळ्या भागातील मुंबईत तुमची राहायची सोय असणार याची मला खात्री आहे. त्या मुळे अधिवेशन बघायला तरुणांना आणावे असे आवाहन श्रीमंत रामराजे यांनी केले.

दुष्काळी भागातील सगळी गावे पाणी मागतात कालव्यातून आलेले पाणी ओढ्यातून सोडा. या भागातील पाण्याची तहान कधीच भागणार नाही. तुम्हाला आजार पाणी येण्याच्या आधीच लागला आहे. पण आपल्याकडे येत असलेल्या पाण्याचा अंदाज घेऊन शेती करा. शेती करताना ड्रीपचा जास्तीत जास्त वापर करा. तरुण पिढी मध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. हा संपूर्ण दुष्काळी भाग असून या सर्वच भागात आधी निसर्गाचे चक्र व्यवस्थित होते. शेती मालाच्या बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेती करा.असेही श्रीमंत रामराजे म्हणाले.

आगामी काळात आपल्या भागात विविध प्रकारचे नवीन कारखाने काढायची जबाबदारी माझी आहे. आपल्या इथे मी फक्त पाणी आणून शांत बसणार नाही, तर विविध प्रकारचे कारखाने आपल्या इथे आणणार असल्याचेही श्रीमंत रामराजे म्हणाले.

फलटण तालुका हा शरद पवार साहेबांचा खूप मोठे देणे लागतो. सगळे पक्ष जरी विरोधात गेले तरी शरद पवार साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्लीत पाठवण्याची आपली जबाबदारी आहे. आगामी काळात माण तालुक्यात कितीही कुणीही गडबड करू द्या तिथेही पवार साहेबानी योग्य ते काम केले आहे. 2009 प्रमाणे फलटण तालुका हा पवार साहेबांच्या पाठीशी राहून संपूर्ण देशात अव्वलच राहिला पाहिजे याची जबाबदारी ही आपल्यावर आहे.

कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक पाटील यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.