सात वर्षांचा मुलगा बेपत्ता

फलटण: सपकळवाडी (तरडफ), ता. फलटण येथील अवघा 7 वर्षांचा लहानगा घराच्या परिसरातून अचानक बेपत्ता झाल्याने गेल्या 3/4 दिवसापासून सर्वत्र त्याचा शोध सुरु असूनही शोध लागत नसल्याने कुटुंबियांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलीस यंत्रणेसह कुटुंबीय शोध कार्यात व्यग्र आहेत.

कल्पेश भाऊसाहेब सकपाळ, वय वर्षे 7, रा. सपकळवाडी(तरडफ), ता. फलटण असे या लहानग्याचे नाव असून बुधवार दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता हा लहान मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे भा. द. वि. कलम 363 नुसार सदर घटना नोंदविण्यात आली आहे. अंगात लाल हाप शर्ट व निळसर रंगाची पॅन्ट घातलेला हा मुलगा कोणास आढळल्यास अथवा त्याच्याबाबत कोणास काही माहिती असलेस फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे समक्ष अथवा 02166 222533 या क्रमांकावर किंवा 8888813744 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.