Your Own Digital Platform

विद्यार्थ्यांकडून परिक्षा काळात स्पिकर बंदीची मागणी

स्थैर्य, फलटण : शहरात ध्वनीक्षेपकांचा वापर करुन फिरत्या वाहनातून सुरु असलेल्या जाहिरातींचा व्यत्यय विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान येत असून अशा पद्धतीच्या जाहिरातींना किमान परीक्षा कालावधीमध्ये बंदी घालावी अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून होत आहे.

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन आठवड्यावर आल्या आहेत. त्यामुळे या परीक्षेला सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. या परीक्षा काळात शहरामध्ये स्पिकर बंदी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

शहरात ध्वनीक्षेपकांचा वापर करुन विविधप्रकारच्या फिरत्या जाहिराती वाहनांच्या माध्यमातून सर्रास सुरु असतात. यावेळी मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण होत असून या आवाजाचा विद्यार्थ्यांना त्रास देखील होतो. त्यामुळे परीक्षा काळात स्पिकर बंदी घालावी अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत. बारावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी पासून तर दहावीची बोर्ड पीक्षा 1 मार्च पासून सुरु होत आहे. या महत्त्वाच्या परिक्षांचा विद्यार्थी कसून अभ्यास करीत आहेत. स्पीकर व ध्वनीप्रदुषणामुळे विद्यार्थी त्रस्त होत आहेत.