Your Own Digital Platform

भारतीय जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मूक फेरी

सातारा: काश्मीर मधील पुलवामा येथे काल सी.आर.पी.एफ.च्या जवानांवर धर्मांध दहशतवाद्यांनी अमानवीय भ्याड हल्ला केला. याप्रकारे भारताच्या सुपुत्रांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सातारकर नागरिकांच्यावतीने शनिवार दिनांक 16 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 7.00 वा.म.गांधी मैदान येथून निषेध मूक फेरीचे आयोजन केले आहे.

या हल्ल्यात आतापर्यंत सी.आर.पी.एफ.चे 42 तसेच रोड ओपनिंग पार्टीचे 2 जवान वीरगतीला प्राप्त झाले. भारताच्या इतिहासातील हा आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. अशा घटनांचा वापर करून धर्मांध शक्तीनी समाजात विद्वेष निर्माण करु नये याची आपण काळजी घेतली पाहिजे._

_शांततेच्या काळात याप्रकारे भारताच्या सुपुत्रांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सातारकर नागरिकांच्यावतीने शनिवार दिनांक 16 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 7.00 वा.म.गांधी मैदान येथून निषेध मूक फेरीचे आयोजन केले आहे. ही निषेध फेरी म.गांधी मैदान- मोती चौक - कर्मवीर भाऊराव पाटील पथ (खालचा रास्ता)मार्गे पोवई नाका येऊन छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी श्रद्धांजली वाहिली जाईल.