Your Own Digital Platform

मोदी अयशस्वी, मग महाभेसळीची गरजच काय?’

वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांच्या महाआघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडत विरोधकांची खिल्ली उडवली आहे. विरोधच्या महाआघाडीला महाभेसळ असं म्हणत, जर केंद्रातील सरकार अपयशी आहे असे विरोधकांचे म्हणणे असेल, तर विरोधकांच्या महाभेसळीची गरज काय आहे असा सवाल करत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांच्या महाआघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडत विरोधकांची खिल्ली उडवली आहे. विरोधच्या महाआघाडीला महाभेसळ असं म्हणत, जर केंद्रातील सरकार अपयशी आहे असे विरोधकांचे म्हणणे असेल, तर विरोधकांच्या महाभेसळीची गरज काय आहे असा सवाल करत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तामिळनाडूतील थिरुपूर येथे ते एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर शरसंधान साधले. या सभेला व्यासपीठावर मोदींसोबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामीही उपस्थित होते.

रविवारी तामिळनाडूतील काही विकासकामांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर थिरूपूर जवळील पेरुमनाल्लुर येथे एका सभेला त्यांनी संबोधित केले. या भागात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय समाजाने स्थलांतर केलं आहे. यावेळी तृणमुल काँग्रेस, काँग्रेस आणि डीएमकेवर मोदींनी निशाणा साधला. ’ विरोधत मोदी सरकार अयशस्वी असल्याचे आरोप करतात. पण मला हे कळत नाही की जर मोदी सरकार अयशस्वी असेल तर सर्व विरोधकांना एकत्रितपणे निवडणूक का लढावी लागते आहे? ही महामिलवट स्वत:च्या फायद्यासाठी काही श्रीमंतांनी तयार केलेली युती आहे.’ मोदींनी तृणमुल,डीएमके आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही

राफेल प्रकरणावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ’ आजपर्यंत संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक घोटाळे काँग्रेसने केले आहेत. काँग्रेसला देशाच्या भल्यासाठी राफेल करार होऊच द्यायचा नाहीये. त्यांना फक्त त्यांच्या काही मित्रांना वाचवायचं आहे.

आम्हाला देशाला संरक्षणात स्वयंपूर्ण बनवायचं आहे. मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचाराला अजिबात थारा नाही’. असंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच तामिळनाडूत संरक्षण कॉरिडोअर सुरू करणार असल्याचं आश्‍वासनही त्यांनी दिलं.