Your Own Digital Platform

सातारा शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
सातारा: शिवजयंतीच्या निमित्ताने ..जय शिवाजी जय भवानी च्या जयघोषात सारा परिसर आनंदाने न्हावून गेला होता. आज सकाळपासूनच पोवईनाका येथील शिवतीर्थावर श्री. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मावळ्यांची रांग लागली होती.

सकाळी नगर पालिका प्रशासनातर्फे राजवाडा येथील गांधी मैदानावरील राजवाडा चौपाटी येथे आकर्षक मेघडंबरी उभारुन पुढे पांढरे हत्ती अर्थात ऐरावत दिमाखात नजरेत भरत होते.त्यांचे समावेत असलेले शिंग व तुतार्यांचे मूर्ती सोबत सेल्फी टिपण्यासाठी सातारकरांची दिवसभर गर्दी होत होती.

सकाळी विविध मान्यवरांचे हस्ते श्री. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा, सज्जनगड, प्रतापगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे आगमन सातारा शहराच्या बाजूने येत होते. या सर्व शिवज्योती पोवई नाका येथील श्री. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करुन पुढे निघत होत्या.

सातारा शहरात शिवजयंती साजरी करताना विविध पेठातील तरुण मंडळे आणि युवा मंडळांनी ऐतिहासिक गड कोट किल्ले आणि देखावे उभारले होते.भगव्या पतांकांनी सातारा शहर पूर्ण पणे भगवे करुन टाकण्यात आले होते.ठिकठिकाणी शिवरायांच्या शौर्यगाथा गाणारे पोवाडे यांनी संपुर्ण परिसर हा शिवमय करुन टाकला गोला होता. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पारंपरीक वेष परिधान करत ढोल ताशांच्या गजरात श्री.छ.शिवाजी महारांजाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

शहरातील शुक्रवार पेठेत उभारेलली बुरुजांच्या पार्श्वभूमीवरील शिवरायांची प्रतिकृती पाहण्यासाठी अलोट गर्दी होत होती. राजवाडा परिसरातील भगव्या पताकांनी वातावरण भगवे झाले होते. होता.

शिवजयंंती निमित्त नगर पालिकेच्या वतीने सातारा शहरातील जुन्या नगरपलिकेत इतिहास संशोधक प्र्रमोद बोराडे यांनी संकलन केेली अनेक दुर्मीळ शस्त्रे प्रदर्शनात पहाण्यास मोठी गर्दी केली होती. केसरकर पेठेतील मावळा प्रतिष्ठानने भव्य बुरुजाच्या पुढे अफजलखघनाचा वध आणि शाहिस्तेखानाची बोटे तोडणारा प्रसंग उभारुनया देखाव्याच्या पार्श्वभूमीवर सिंहासनाधिष्ठित शिवरायांना अभिवादन केले. .तसेच यादोगोपाळ पेठेतील अजिंक्य मंडळ तसेच सप्ततारा समुह, आकर्षक फुलांच्या देखाव्यात शिवरायांचे पुजन केेले होते. गोल मारुती मित्र मंडळाने भव्य स्टेजवर शिवरायांची अधर्ंप्रतिमा उबारली होती. सायंकाळी राजवाडा पसिरातूनशिवचरित्राचे विविध देखावे सादर करणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

छावा ग्रुपकडून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकेही सादर.

सातारा शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सातार्‍यातील छत्रपती शिवाजी महाविद्यायतही अनेक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.प्रथम अजिंक्यतारा किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यात आली. यावेळी अनेकांनी भगचवे फेटे परिधान केले होते. मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे पोवाडे तसेच छावा ग्रुपकडून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी शिवज्योतीचे स्वागत केले. नंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात छावा दांडपट्टा ग्रुपच्या सागर लोहार आणि त्याच्या सहकार्‍यांनी सादर केलेल्या थरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.यामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी, कुर्‍हाड, भाला फिरविणे, दांडपट्टा, हनुवटीखाली लिंबू ठेवून तलवार फिरवून ते कापणे, नारळ डोक्यावर ठेवून तो काठीने फोडणे, अग्निचक्र फिरविणे अशा अनेक साहसी खेळांनी डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांचे झांजपथकही आकर्षण ठरले.

सातारा नगरपालिका व शाहूपुरी विकास आघाडीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा, गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. शहीद वीरांना अभिवादन करण्यात आले.तसेच महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या जय घोषणा सारा परिसर दुमदूमुन गेला होता.

सातारा जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी स्वछता मोहीम राबविण्यात पुढाकार घेतला. सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता. शिवसेना, रासप,रिपब्लिकन पक्ष,वंचित बहुजन आघाडी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस,एम आय एम, लोकजनशक्ती पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, डाव्या आघाडीच्या पक्ष कार्यकर्ते शिवजयंती निमित्त एकत्र उपस्थित झाल्याचे सातारकर शिवभक्तांनी पाहिले. सर्वत्र भगवे झेंडे, पताके,यामुळे जिल्ह्यात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.शिवरायांची प्रतिमा व लहान पुतळे यांचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध घराबाहेर पडले होते. युवकांना सबत युवतींचाही सहभाग लक्षणीय होता. श्रमिक मुक्ती दलाच्या आंदोलकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी शिव प्रतिमेचे पूजन केले.तसेच विविध ठिकाणी व्यापारी वर्ग, पेट्रोल पंप, शाळा, महाविद्यालय,सार्वजनिक ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली.

प्रतापगडावरही शिवजयंती उत्साहात साजरी.

महाबळेश्वर तालुक्यातील प्रता पगडयेथे शिवजयंतीनिमित्त सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी 7.15 वाजता श्री. भवानी मातेस जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याहस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8.15 वाजता भवानीमातेची महापुजा पदाधिकारी व अधिकार्यांच्या हस्ते करण्यात आलीे.

सकाळी 9 वाजता भवानी माता मंदिरासमोर कुंभरोशी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याहस्ते ध्वजारोहण सोहळा होउन 9.15 वाजता भवानी माता मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक झांजपथक व ढोल पथकांच्या गजरात काढण्यात आली.

सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ पूजन व ध्वजारोहण सोहळा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाल्यावर .सकाळी 10 ते 11 यावेळेत रयतसेवक व जि.प.सदस्य डॉ. शिवाजीराव चव्हाण यांचे शिवचरित्रावर व्याख्यान, उपशिक्षक सागर पवार यांचे छत्रपती शिवरायांचे कार्य व सध्यस्थिती यावर व्याख्यान, शंभू महाराज मालिकेतील राणूआक्का फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे यांचे व्याख्यान झालेे.

सकाळी 11 ते 11.30 वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होउन शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम झाला, त्यानंतर श्री भवानी माता मंदिरात महाआरतीचा कार्यक्रम झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, रोहिणी आखाडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.