मंगळवारी संत रोहिदास जयंती उत्सवाचे आयोजन

दुधेबावी ः  फलटण तालुका चर्मकार समाजाच्या वतीने मंगळवार दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता साई प्रसिद्धी हाँल गजानन चौक फलटण येथे श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक कांबळे यांनी दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.दिपक चव्हाण, स्वराज उद्योग समुहाचे प्रमुख रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार बाबुराव माने, फलटण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे , सौ. जयश्री आगवणे , नगरसेविका सौ. ज्योती खरात, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनवलकर, पत्रकार यशवंत खलाटे,डॉ. प्रविण आगवणे , युवराज पवार, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, विष्णू पोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.