Your Own Digital Platform

खटाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजना लाभार्थींचा फेरसर्वे करण्याची मागणी

तहसीलदार जयश्री आव्हाड यांना निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले व इतर 


वडूज: खटाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थींचा फेरसर्वे करण्यात यावा . या मागणीसाठी आर.पी.आय(ए) च्या ब्ल्यू फोर्सच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार जयश्री आव्हाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतची निवेदनातील अधिक माहिती अशी की, या योजने मध्ये गोरगरीब मराठा,माळी,रामोशी,

साळी,तेलि,कुंभार,वडार,वाणी,सुतार,ठाकूर,कोळी,फासेपारधि,मुस्लिम,वंजारी,गुरव,न्हावि,धनगर,कातकरी अशा सर्व सामाजातील गोरगरीब लोकांना प्रधानमंत्री आवास मागेल त्याला घर देण्यात यावे तसेच त्या संदर्भात लाभार्थीं फेरसर्वे करण्यात यावा. अनुसुचित जाती करिता असलेल्या रमाई घरकुल योजने संदर्भात खरे व लायक गरजू यांना घरकुल मिळाणे कामी फेरसर्वे होणे आवश्यक आहे.सदर योजने मध्ये घरकुलासाठि जागा उपलब्द नसनार्‍या लाभार्थींनी रु.100 स्टॅप वर जागेसंदर्भात अ‍ॅफिडेव्हिट दिले तर त्यांना लाभ देण्यात यावा.तसेच या योजने मध्ये चुकिचा सर्वे करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करण्यात यावि या योजनेमध्ये अनुसुचित जातितिल सर्व घटकांना घरकुल देण्यात यावीत.

प्रधानमंत्री आवास योजनेमधुन लाभार्थींना पाच ब्रास वाळू मोफत दिली जाते तसेच रमाई घरकुल लाभार्थीस पाच ब्रास वाळू मोफत देण्यात यावी.

तरी गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा रिपाई ब्ल्यु फोर्स तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ,याची नोंद घ्यावी.असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

यावेळी उपाध्यक्ष गणेश भोसले ,जि.कार्याध्यक्ष अजित नलवडे तालुका अध्यक्ष बापुराव वायदंडे

ता. उपाध्यक्ष संदिप काळे,ता. सरचिटणिस कमलेश आवळे,ता. संघटक रविकुमार इंजे,जि. कार्यकारणी सदस्य आनिल उमापे , विकास कमाने ,विजय भोसले(सरपंच),अजित भोसले,प्रकाश कदम,सुरज भोसले,प्रतिक भोसले,भरतसिंह राजपुरोहित,यश भंडारे आदी उपस्थित होते.