Your Own Digital Platform

शरद कृषी प्रदर्शन शेतकर्यांना मार्गदर्शक

लोणंद
: लोणंदच्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतीत प्रगती कशी करता येईल त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन सुधारित माहिती मिळणार आहे. अशा प्रदर्शनातून शेती व जीवनाकडे बघण्याची दृष्टी, नवीन विश्वास, प्रेरणा, मिळणार आहे. त्यामुळे लोणंदचे कृषी प्रदर्शन शेतकर्यांना मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी केले.

लोणंद येथील बाजार तळावर सुवर्णगाथा उत्सव समिती,साद सोशल ग्रुप लोणंद, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर प्रतिष्ठान, आ. मकरंद आबा विचार मंच, कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद यांच्यावतीने आयोजित शरद कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात आ. अजित पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषद सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर होते. स्वागताध्यक्ष आ. मकरंद पाटील, निमंत्रक जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी आ. दिपक चव्हाण, कृषी सभापती मनोज पवार , जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, जि.प. सदस्य उदय कबुले, सौ. दिपाली साळुंखे, सभापती मकरंद मोटे, माजी सभापती रमेश धायगुडे, नगराध्यक्ष सचिन शेळके, सुवर्ण गाथा उत्सव समितीचे निमंत्रक डॉ. नितीन सावंत, बाळासाहेब सोळस्कर, सुभाष शिंदे, डी. के .पवार, बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सरकारच्या सरसकट कर्ज माफीचा अर्थ समजला नाही. शेतकर्याला कागदपत्रे गोळा करायला लावून चेष्ठा चालवली आहे. वर्षाला सहा हजार रुपये देणे म्हणजे पाच जणांच्या एका कुटुंबाला साडेतीन रूपये आहेत तेवढ्यात चहा तरी येतो का? असा सवाल आ. पवार यांनी केला.

केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असून पश्चिम महाराष्ट्रवर अन्याय केला जात आहे. या सरकारचा व शेतीचा अर्थाअर्थी संबंध नाही. कर्जमाफी द्यायला अडीच वर्षे लागली आहेत. शरद पवार यांनी महिन्यात कर्जमाफी देऊन सातबारा कोरा केला होता. आम्हाला अजून सरसकटचा अर्थ कळाला नाही हिरवी यादी, पिवळी यादी अशी शेतकर्याची चेष्टा चालवली आहे.

संजीवराजे म्हणाले, कराडच्या धर्तीवरील लोणंदचे शरद कृषी प्रदर्शन दर वर्षी होण्यासाठी जिल्हा परिषदेने निर्णय घेतला आहे. शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी शेती मालाला भाव द्यावा पण चेष्ठा करू नये. यावेळी मनोज पवार, सचिन शेळके, डॉ. नितीन सावंत, हणमंत शेळके, दिपाली क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, या प्रदर्शनात अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन, अवजारे, यंत्रे. वाहने आदींचे सुमारे 300 स्टॉल सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातील शासकीय कृषी विभाग, ऑटोमोबाईल, ऑटो इंजिनिअरिंग, बचत गटांचे विविध स्टॉल, अमेनजिंग पार्क , व पशु - पक्षी साठी सुमारे 300 दालने उभारण्यात आली आहेत. सुवर्ण गाथा उत्सव समितीच्यावतीने नगरसेवक योगेश क्षीरसागर, विश्वास शिरतोडे, अ‍ॅड. सुभाष घाडगे, विकास केदारी, शिवाजीराव शेळके, नंदा गायकवाड, भरत शेळके, विठ्ठल शेळके, भिकू रासकर, सागर शेळके, गजेंद्र मुसळे, रविंद्र क्षीरसागर, एन.डी क्षीरसागर, दशरथ जाधव, संभाजी घाडगे, शंकरराव क्षीरसागर,मयुर गायकवाड, कय्युम मुल्ला यांनी मान्यवरांचे स्वागत केले.