Your Own Digital Platform

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ विविध स्तरातून निषेध, बंद, रॅलीचे आयोजनविडणी येथे शहीदांना श्रद्धांजली

स्थैर्य, विडणी: पुलवामा येथे लष्करावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्याचा निषेध करत हल्यात वीर मरण आलेल्या जवानांना विडणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

विडणी ता.फलटण ग्रामपंचायत समोर श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे ग्रामपंचायत सरपंच सौ.रुपाली अभंग ,उपसरपंच अमोल नाळे, पञकार सतिश कर्वे बबनराव शिदे संजय अभंग प्रशांत जाधव मारुती नाळे,श्रीनिवास पवार दत्तु कोकरे कैलास गोसावी बशिर शेख राजेद्र सुतार अशोक काका पवार सुभाषराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विद्यार्थ्यानी पाकीस्तान विरोधी घोषणा देत दहशतवाद्यांना पोसणार्या पाकीस्तान मध्ये घरात घुसून नायनाट करा असा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करणेत आला.

तसेच उपस्थित्तांनी मेणबत्ती लावून वीरजवांनाना श्रध्दांजली वाहून वीर जवार अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी ग्रामस्थ व विद्यर्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

वाठार स्टेशन येथे निषेध रॅलीचे आयोजन

स्थैर्य, वाठार स्टेशन: काश्मीर मधील पुलवामा येथे राज्य राखीव दलाच्या जवानांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचे तीव्र पडसाद वाठार स्टेशन येथे उमटले.

श्री वाग्देव विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक तसेच वाठार स्टेशन येथील सर्व ग्रामस्थ सकाळी 11 वा. च्या दरम्यान एकत्र येऊन अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बाजार चौकातून घोषणा देत निषेध रॅली काढली.

एसटी स्टँड वर आल्यानंतर वाठार स्टेशन येथील ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या आवाजात पाकिस्तान मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रॅलीत वाठार स्टेशन येथील मुस्लिम समाजाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यानंतर वाठार स्टेशन येथील स्थानिक पदाधिकारी,विद्यालयाचे प्राचार्य, तसेच मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ आपली मते व्यक्त केली.

तसेच वाठार स्टेशन येथील युवकांनी, विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी केली व पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या.

मायणीत उस्फूर्त बंद व तीव्र निषेध

स्थैर्य, मायणी : जम्मू काश्मीरमध्ये अलवामा येथे भारतीय जवानांवर अतिरेक्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्करातील 44 जवान शहीद झाले. त्याच्या तीव्र भावना मायणीमध्ये उफाळून आल्या. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी मायणीत निषेध रॅली काढण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, वंदे मातरम्, भारतमाता की जयच्या घोषणा देत निषेध रॅलीने संपूर्ण गावातून रॅली काढली. सदर रॅलीमध्ये अनेक युवक सहभागी झाले होते. त्याचबरोबर या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.

त्यानंतर रात्री मायणी मेडीकल असोशिएशन, मेडीकल कॉलेजचे विद्यार्थी, मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने पुरूषांसह माहिलांचा मोठा सहभाग होता. तसेच बाजारपटांगणावरील स्मृती स्तंभाजवळ शहीद जवानांना नागरिकांचे वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ मायणीमध्ये उस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.