सावित्रीबाई, जिजामाता अन रमाबाईची प्रत्येक भगिनी वारसदार : यशेंद्र क्षिरसागर

कोरेगाव: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर जिजामाता आणि राणी लक्ष्मीबाई यांची प्रत्येक भगिनी ही वारसदार आहे हा उज्ज्वल वारसा या भगिनींनी प्राणपणाने जपावा आशाताईंचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते विस्ताराधिकारी अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले

येथे आयोजित आशाताईंचा मेळावा आणि स्नेहसंमेलन यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी पंचायत समितीचे सभापती श्री राजाभाऊ जगदाळे सहाय्यक गटविकास अधिकारी अलमास सय्यद तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र जाधव जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव भोसले भीमराव काका पाटील जयश्री फाळके पंचायत समिती सदस्य साधना बनकर डॉक्टर होळ जिल्हा समन्वयक करण जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे सावित्रीबाई फुले आणि राणी लक्ष्मीबाई या एकाच काळातील होत्या सावित्रीबाईंनी शिक्षणाचा वसा समृद्ध केला तर लक्ष्मीबाईंनी आपल्या राज्याचा देशभक्तीचा पाया पक्का केला भगिनींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी शिक्षण थांबवू नये सर्व आशाताईंनी आपली चिकाटीचे काम असेच सुरू ठेवावे महिलांच्या प्रगतीच्या आड आता कोणीही येऊ शकत नाही संपूर्ण समाजव्यवस्था त्यांच्या पाठीशी आहे असे स्पष्ट करून क्षीरसागर म्हणाले संघभावनेने काम केल्यास कोणतेही काम अशक्य नाही आशाताईंची तळमळ धडपड मेहनत आणि श्रद्धा वाखाणण्याजोगी आहे भारतातील महान महिलांचा वारसा त्या प्राणपणाने जपत आहेत यावेळी श्री क्षीरसागर यांनी महापुरुष महान स्त्रिया संत यांचे कर्तृत्व उदाहरणासह उलगडून दाखवले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय आशाताईंचा आणि गटप्रवर्तक यांचा सत्कार करण्यात आला सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये आशाताईंच्या सर्व समस्या सोडवून मानधनवाढीसाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्‍वासन दिले

अलमास सय्यद यांनी स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे कळकळीचे आवाहन केले जिल्हा समन्वयक करण जगताप यांनी सुंदर विश्‍लेषणात्मक मनोगत व्यक्त केले

भीमराव काका पाटील साधना बनकर जयश्री फाळके जयवंत भोसले या सर्वांनी मनोगत व्यक्त करून आशाताईंना शुभेच्छा दिल्या

रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आधी स्पर्धा घेऊन पारितोषिक वितरण झाले तसेच अशा गटप्रवर्तक यांनी आपल्या कला आनंदाने साजरा करून हा मेळावा सफल केला डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले विस्तार अधिकारी अमर निंबाळकर यांनी आभार मानले

No comments

Powered by Blogger.