Your Own Digital Platform

माणमध्ये कुणीही कितीही गर्जना करुद्या; तिथेही पाण्यासाठी माझेच काम

स्थैर्य, पुणे : कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. समवेत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर  व मान्यवर. (छाया: महेश सुतार)


ना.रामराजे; पुण्यात श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानचे दिमाखात उद्घाटन
पुणे : पाणी हे माझ्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ठ होते व आहे. कॅनॉलचे पाणी पहिल्यांदा आल्यावर पाणीपूजनाप्रसंगी एक महिला आपल्या शिवारात आलेल्या पाण्याला ओवाळते हाच माझा आनंद. जसे फलटण व खंडाळा तालुक्यात मी पाणी आणले आहे तसेच माण तालुक्यातही मीच पाणी आणले आहे व आणणार आहे. तिथं कुणीही कितीही गर्जना करूद्या परंतु तिथेही पाणी आणण्याचे काम माझेच आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुणे येथे श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानच्या उद्धघाटनपरसंगी केले.

या वेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका श्रीमंत शुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत नंदिनीराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सदस्य व युवा नेते श्रीमंत विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, फलटण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, पुणे महापालिकेच्या माजी महापौर सौ.राजलक्ष्मी भोसले, प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे व मुंबई येथील मोठ मोठ्या हॉस्पिटल आरक्षित नसणार्‍या कॉट कुणाला मिळू देत नाही. त्यांच्यासाठी शासनाने आरक्षित करण्यासाठी ठरवलेली नियमावलीही ते नीट पाळत नाहीत. श्रीमंत रामराजे प्रतिष्ठाच्या माध्यमातून खूप चांगली यंत्रणा उभी करायची आहे. आता ह्याच्या पुढे वैद्यकीय सेवेत भरीव काम करायचे आहे, असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.

श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण चांगले विचारवंत बोलावू. मोठं मोठे कार्यक्रम आयोजित करू. हे सगळे करत असताना युवकांना रोजगार मिळण्यासाठी जास्तीत जास्त कारखाने आपल्या इथे काढायला लागणार आहेत. आताच्या जमान्यात नोकरी ही अत्यावश्यक आहे. 2019 ची निवडणूक आपण सगळे योग्य रीतीने पार पाडू, असेही श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ठ केले.

मी कॉलेजला असताना पुणे महापालिकेशेजारी ताराराणी नावाचे हॉस्टेल तिथे होते. त्या वेळी आमच्या बरोबर असलेल्या सर्वाना काही अडचणी येत होत्या त्या सोडवण्यासाठी काही तरी करावे असे वाटत होते. आताच्या मुलांना ज्या अडचणी येतात ते दूर करण्याचे काम आम्ही नक्कीच करतो व करणार आहे. आज ज्या अडचणी युवकांपुढे व विद्यार्थ्यांपुढे आहेत त्या 1070 च्या पिढी पासून होत्या व आहेत. त्या वेळी अडचणी फक्त वेगळ्या होत्या. पहिल्या पासून युवक व विद्यार्थीं पुण्यात चांगले जीवन जगण्यासाठी येत होते व आहेत. आपल्या भागातील माणसांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी या प्रतिष्ठानने काम करावे व रघुनाथराजे यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भागातील मुलांसाठी एक हॉस्टेल उभे करावे व त्यासाठी आपल्या येथील परंतु पुणे येथे प्रस्थापित झालेले राम निंबाळकर, सत्यजित निंबाळकर, विजय कुंभार यांच्या सारख्यांची मदत या प्रतिष्ठानने घ्यावी, असे आवाहनही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

श्रीमंत रामराजेंच्या कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून देण्याची काही गरज नाही. श्रीमंत रामराजेंना संपूर्ण राज्यात ओळखतात व त्यांचे मित्रही संपूर्ण राज्यात आहेत. श्रीमंत रामराजेंचे कार्य हे या आगोदर कुणी केले नाही व या पुढेही कोणी करेल असे मला वाटत नाही.

भोसले घराण्याच्या पूर्वीपासून नाईक-निंबाळकर घराणे आहे. संस्थानकाळापासून ते आज अखेर नाईक निंबाळकर घराण्याची लोकसेवा अखंडित सुरू आहे व पुढेही सुरु राहील. श्रीमंत रामराजे यांच्यासारखे आगळे वेगळे नेतृत्व आपल्याला लाभले आहे. श्रीमंत रामराजे यांना सर्व क्षेत्राचा अनुभव आहे. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार साहेबांनंतर रामराजे साहेबांचेच काम राज्यात आहे, असे फलटण कोरेगाव विधान सभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले.

रामराजेंच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन झाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करतो. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कायम आपल्या जिल्ह्याच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. कृष्णेचे पाणी आज आंदरूडला जाऊन पोहचले आहे. श्रीमंत रामराजे हे पहिल्यांदा अपक्ष उभे असताना सौ. राजलक्ष्मी भोसले ह्या आर्थिक मदत घेऊन गिरवी येथे आल्या होत्या. त्यांच्या सारखे अनेक स्नेही राज्यात आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजब रसायन आहे. फलटण बाजार समितीतर्फे आवक आणणार्‍या शेतकर्‍यांना संपूर्ण मेडिक्लेम करणार आहे. श्रीमंत निर्मालादेवी यांच्या नावाने लवकरच हॉस्पिटल उभे करत आहे. कँसरसाठी विशेष व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये उभी करणार आहे. पुण्यातील एखादी जागा शोधून काढा आणि त्या ठिकाणी आपल्या भागातील मुलांसाठी हॉस्टेल सुरु करा. कृष्णा खोर्‍यातील धोम बालकावडी हा एकमेव प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे फलटण तालुका हिरवागार झाला आहे. फलटणच्या राज घराण्याच्या 28 पिढ्यात श्रीमंत रामराजेंसारखा कुटुंब प्रमुख झाला नाही आणि पुढे होणारही नाही. फलटणच्या राज घराण्याला राजकीय अडगळीतून बाहेर काढण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. फलटणच्या राजघराण्याचा राजकीय डी.एन.ए. हा राष्ट्रवादीचाच आहे, असे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानचे कार्य आदर्शवत राहील याची मला खात्री आहे. रामराजेंना चिडलेले मी आज पर्यंत पाहिले नाही. मला बरेच वेळा प्रश्‍न पडतो कि, चिडणे कसे असते हे रामराजेंना माहीत नाही कि काय ? रामराजेंच्या नावाने प्रतिष्ठान सुरू केले म्हणजे तिथेच 50 ते 60 टक्के काम या पदाधिकार्‍यांचे झाले. पुण्यात येणार्‍या तुमच्या भागातील कुणालाही कसलीही अडचण आली तर थेट आमच्याशी संपर्क साधावा. रामराजे जसे आम्हाला कायम मदत करतात तशीच आम्हीही तुम्हाला करू असे आश्‍वासन सौ.राजलक्ष्मी भोसले यांनी दिले.

या कार्यक्रमास पुणेस्थित फलटणकर बहुसंख्येने उपस्थित होते.

या वेळी पुणे महापालिकेचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सिद्धेश माने यांनी केले तर आभार प्रशांत नाळे यांनी मानले.