अ‍ॅड. डी. व्ही. पाटील यांना प्रतापसिंहराजे पुरस्कार जाहीर

सातारा: स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणार्या कराड व पाचगणी नगरपालिकांना सातार्‍याचे लोकनियुक्त पाहिले नगराध्यक्ष श्री. छ. प्रतापसिंहराजे ऊर्फ दादा महाराज उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार तर, श्री. छ. प्रतापसिंहराजे (थोरले) पुरस्कार 2019 जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. डी. व्ही. पाटील यांना जाहीर झाला आहे.

सातारा पालिकेने यावर्षीपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींचा व संस्थांचा सन्मान करण्याचे ठरवले आहे. त्यानिमिताने श्री. छ. प्रतापसिंहराजे ऊर्फ दादा महाराज उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, लोकनियुक्त पाहिले नगराध्यक्ष श्री. छ. प्रतापसिंहराजे ऊर्फ दादा महाराज उत्कृष्ट नगरपरिषद, श्री. छ. प्रतापसिंहराजे (थोरले) पुरस्कार 2019, राजमाता जिजाऊ पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार वितरण सोहळा दि. 12 रोजी शाहू कलामंदिर येेथे सकाळी 11 वाजता राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले व श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते तसेच नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सभापती व नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

No comments

Powered by Blogger.