Your Own Digital Platform

शिवजन्मोत्सवा निमित्त वडुजमध्ये आजपासून विविध कार्यक्रम

वडूज :येथील शिवजयंतीनिमित्त आजपासून बॉक्सर ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत. यात विविध मान्यवरांची व्याख्याने ,रक्तदान शिबीर, महाशीव रॅली आदीसह विविध कार्यक्रम होणार आहेत.

आज सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर,सायंकाळी 7 वाजता विजय शिंदे यांचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दि.-16 रोजी 7 वाजता भूषण प्रतापराव शिंदे यांचे पराक्रमी मराठे या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दि.16 ते सोमवार दि.18 रोजी पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचायत समितीच्या बचत सभागृहात भव्य शिवकालीन शस्त्र व भारतातील गडकिल्ले छायाचित्राचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे

रविवार दि.17 रोजी विक्रमसिंह पाटील यांचे शिवकालीन शस्त्रे या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवार दि.18 रोजी रात्री 9 वाजता जागर गोंधळ होणार आहे.

मंगळवार दि.19 रोजी सकाळी 9 वाजता महाशिव रॅली काढण्यात येणार आहे.दुपारी 2 वाजता हलगी पथक,दांडपट्टा,धनगरी ढोल तास्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.