वन उद्यानाचा शहरवासियांनी लाभ घ्यावा

फीत कापून वनउद्यानाचे उद्घाटन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, उप वन संरक्षक सातारा डॉ. भारतसिंह हाडा, वनक्षेत्रपाल एस.के.घाडगे व त्यांचे सहकारी अधिकरी. 

फलटण
: कृषी, औद्योगिक क्षेत्रातील विकासापाठोपाठ शहरातील व्यापार/व्यवसायात वाढ होत असून नगर परिषदेच्या माध्यमातून आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असतानाच न उभारण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्तवन खात्याच्या माध्यमातून शहरवासीयांसाठी उपयुक्त उद्या करीत शहरवासीयांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

विमान तळालगतच्या वनखात्याच्या जागेवर, वन खात्याने उभारलेल्या वन उद्यानाचे उद्घाटन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आ. दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलींद नेवसे, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक/नगरसेविका, उप वन संरक्षक सातारा डॉ. भारतसिंह हाडा, सहाय्यक वन संरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा एस.बी.चव्हाण, वनक्षेत्रपाल फलटण एस.के.घाडगे यांच्यासह फलटणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी वनक्षेत्रपाल एस.के.घाडगे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात फलटण शहरात वनविभागाचे एकुण 55.46 हेक्टर क्षेत्रअसून या क्षेत्रावर रोपवन, लागवड, वनक्षेत्र कार्यालय, शासकीय निवासस्थान, वनउद्यान, औषधी वनस्पतींची लागवड वगैरे करण्यात आली असून या वनक्षेत्रामध्ये अतिक्रमण होवू नये यासाठी काही क्षेत्रावर संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रावर संरक्षक भिंत उभारणे व रोपवन कामे घेणे प्रस्तावित असल्याचे वनक्षेत्रपाल घाडगे यांनी सांगितले.
विमान तळालगत, फलटण न्यायालयासमोर वनखात्याच्या 4.28 हेक्टर (10.70 एकर) क्षेत्रावर सन 2011-12 पासून वनउद्यान उभारण्याचे काम सुरु करण्यात आले असून या वन उद्यानात नक्षत्र वन, नाना नानी पार्क, बालोद्यान, माहिती केंद्र, औषधी वनस्पती उद्यान, पदपथ, ऑरनामेंटल प्लांटस, जॉगींग ट्रॅक, पॅगोडा, वेली मंडप वगैरेंची उभारणी पूर्ण करण्यात आली असून त्यासाठी आतापर्यंत 1 कोटी 92 लाख 28 हजार 180 रुपये खर्च जिल्हा वार्षिक योजना अनुदानातून करण्यात आला आहे. तत्कालीन उपवन संरक्षक एन.आर.प्रविण, ए.एम.अंजनकर यांचे तसेच विद्यमान उपवन संरक्षक डॉ. बी.एस.हाडा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे वनक्षेत्रपाल एस.के.घाडगे यांनी निदर्शनास आणून दिले.
याकामी जिल्हा वार्षिक योजना अनुदान उपलब्धतेसाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण यांचेही नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे वनक्षेत्रपाल घाडगे यांनी निदर्शनास आणून दिले.
या वन उद्यानाचे कामकाज पाहण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती (नागरी क्षेत्र) सन 2016 मध्ये स्थापन करण्यात आली असून या समितीच्या सभेतील निर्णयानुसार उध्यानाची वेळ सकाळी 6.00 ते सायंकाळी 7.00 अशी निश्‍चित करण्यात आली असून या उद्यानातील प्रवेशासाठी लहान मुलांना प्रत्येकी 5 रुपये व मोठ्या व्यक्तीसाठी प्रत्येकी 10 रुपये, मासिक पास 100 रुपये, तिमाही 250 रुपये, 6 माही 500 रुपये व वार्षिक 900 रुपये प्रवेश फी निश्‍चित करण्यात आली असल्याचे वनक्षेत्रपाल घाडगे यांनी निदर्शनास आणून दिले. 

No comments

Powered by Blogger.