योगासने आणि प्राणायामचे डॉ. यादव यांच्या हस्ते प्रकाशन



पुणे: योगासने आणि प्राणायाम या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. गिरीश सरडे व लोकमान्य उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी. के. यादव यांच्याहस्ते करण्यात आले.

पर्वतीमधील निर्मल बाग हॉलमध्ये झालेल्या योगासने आणि प्राणायाम या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन सोहळ्यास योगाचार्य सतीश अरगडे, आंतरराष्ट्रीय योगाचार्य शिवाजी घोडके, योगासने आणि प्राणायाम या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे , डॉ. मृणाल आशय जमदाडे, लोकमान्य नर्सिंग होमच्या संचालिका डॉ. सुरेखा यादव, समाजसेविका मेघना ससाणे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. मनोजा जोशी, अजित जमदाडे, सुनिता जमदाडे , सुप्रिया ताम्हाणे, शितल कचरे उपस्थित होते .

आजच्या धकाधकीच्या काळात महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योगासने आणि प्राणायाम या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर घर व्यवस्थित राहील. महिलांनी आपल्या दैनदिन जीवनातून आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना योगासने व प्राणायाम करता येतील. या पुस्तकात सर्व आसनांची माहिती सचित्र माहितीसह प्रकाशित केली आहेत . त्यामुळे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. अशी माहिती योगासने आणि प्राणायाम या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे यांनी दिली.

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक कमल मारुती ननावरे यांनी केले तर सूत्रसंचालन मंगल बोरावके यांनी केले.

आभार डॉ. मृणाल आशय जमदाडे यांनी मानले .

No comments

Powered by Blogger.