Your Own Digital Platform

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवरात्री निमित्त महारुद्र,नृत्य,संगीत,चित्रकला महोत्सवाचे आयोजन

दि.24 फेबु्रवारी ते सोमवार दि.4 मार्च 2019 पर्यंत भरगच्च कार्यक्रम.

सातारा
: कांची कामकोटी पीठाचे महास्वामी प.पू.शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती तसेच प.पू. जयेंद्र सरस्वती व त्यांचे परमशिष्य प.पू.शंकरविजयेंद्र सरस्वती यांच्या शुभाशिवार्दाने सातारा येथे साकारण्यात आलेल्या प्रसिध्द अशा श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यामध्ये सध्या मंदिरात 5 फेब्रुवारीपासून दररोज सकाळी 6 ते 10 व दुपारी 3 ते 5 यावेळीत 3 मार्च 2019 पर्यत महारुद्र अनुष्ठान व महारूद्र जप करण्यात येणार आहे.

याही वर्षी शनिवार दि. 24 फेब्रुवारी 2019 पासून सोमवार दि, 4 मार्च 2019 पर्यंत हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. यावर्षी या महोत्सवात स्थानिक कलाकारांना विविध कला सादरीकरणासाठी प्राधान्य मिळावे म्हणून विशेष आयोजन करण्यात आले असून दररोज सादर होणार्या नृत्य समारंभाचे प्रसंंगी या कलाकारांना आपली फाईन आर्ट चित्रकला सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षीही या महोत्सवात स्थानिक कलाकारांची चित्रे व शिल्पे सादर होउन यावर्षी यात सहभाग घेउ इच्छिणार्यांना महाशिवरात्रीला विशेष स्मृतिचिन्ह देउन गौेरवण्यात येणार आहे अशी माहिती संयोजिका सौ.उषा शानभाग यांनी दिली. तसेच अधिक माहिती साठी मोबाईल क्र. 9822159800 किंवा 7741090639 वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. मंदिरात महाशिवरात्री निमित्त महारुद्र ही घेण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रमात रविवार दि. 3 मार्च व सोमवार दि. 4 मार्च दरम्यान महारुद्र व महाशिवरात्रीचे विविध धार्मीक कायर्ंक्रम संपन्न होणार आहेत.

नृत्य, चित्र व संगीत महोत्सवात रविवार दि.24 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पुणे येथील लास्य नृत्यालयाच्या गुरू सौ. मैत्रेयी बापट व त्यांच्या शिष्यांचे कडून भरतनाट्यम सादर करणार आहेत. सोमवार दि.25 फेब्रूवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पुणे येथील सौ.सानिका कक्कर यांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. मंगळवार दि.26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता कराड येथील शिवरंजनी ग्रुपचे गुरू रविंद्र पंडीत यांचे शिष्यकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे.

बुधवार दि.27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन तसेच ब्ल्यू नोट गिटार क्लासेसच्यावतीने गिटार, व्हायोलीन व तबला यांची जुगलबंदी सादर होणार आहे. गुरूवार दि.28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता सातारा येथील सौ. अमृता साठे यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार असून त्यांना यावेळी तबलासाथ शांताराम दयाळ व हार्मोनिअम साथ बाळासाहेब चव्हाण करणार आहेत. शुक्रवार दि.1 मार्च रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पुणे येथील अनुया जोशी व सहकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे.

शनिवार दि.2 मार्च रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पुणे येथील गुरु मैत्रेयी बापट यांच्या शिष्या ऋचा उमेश आगाशे व सहकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे.

रविवार दि.3 मार्च रोजी कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य पीठाधिपती प.पू. श्री शंकरविजेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांच्या जयंती उत्सव मंदिरात साजरा होणार असून सायंकाळी साडे सहा वाजता मुंबई येथील गुरू रोशनी म्हात्रे व संतोष लिंबोरे यांच्या समुहाच्यावतीने लोकगीत व कोळीगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. सोमवार दि.4 मार्च रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या शिष्यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यानंतर सायंकाळी सहा ते आठ यावेळेत सातारा येथील नटराज नृत्यकला विद्यालयाच्या गुरु सौ.आंचल घेारपडे व सहकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजेपयर्ंंत मंदीर दर्शनासाठी खुले रहाणार आहे.या नटराज महाशिवरात्री महेात्सवासाठी सातारा जिल्हा वासियांनी तन, मन,धन अर्पून सहभागी व्हावे असे आवाहन मंदीराचे वतीने करण्यात आले आहे.