दयानंद गावडे यांचा विशेष सन्मान

पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना विशेष प्रशंसा पत्राने सन्मानित करताना पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, शेजारी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महासंचालक विश्‍वास नांगरे पाटील, पुणे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील. 

फलटण: गुणवरे ता. फलटण येथील रहिवाशी आणि पुणे ग्रामीण पोलीस दलांतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना पोलीस महासंचालक यांच्या हस्ते विशेष प्रशंसापत्राने पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील विशेष कार्यक्रमात नुकतेच गौरविण्यात आले आहे.

भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रम दि. 1 जानेवारी 2019 रोजी आव्हानात्मक पोलीस बंदोबस्त अतिशय कौशल्य पूर्वक, पूर्ण नियंत्रण ठेऊन हाताळल्याबद्दल पोलीस महासंचालक मुंबई मा. दत्ता पडसलगीकर, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महासंचालक मा. विश्‍वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. संदीप पाटील यांच्या हस्ते प्रशंसापत्राने सन्मानित करण्यात आले.

पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे. गुणवरे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.