Your Own Digital Platform

आदीवासी मुलांमधील गुण हेरल्यास राष्ट्रीय खेळाडू बनतील:चव्हाणपांचगणी:आदिवासी मुलांना चांगलं ज्ञानार्जन करण्याचं काम पांचगणीतील इंग्रजी माध्यमांची विद्यासंकुले करीत आहेत. आदिवासी मुलांच्या मध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे.त्यांच्यातील सुप्त कला गुण हेरून शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिल्यास या मुलांमधून उद्याचे राष्ट्रीय खेळाडू तयार होतील असा ठाम विश्वास जिल्हा माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी काढले.

न्यू ईरा हायस्कूल च्या मैदानावर नामांकित स्कूल असोशिएशन पांचगणी यांनी आयोजित ’ उमंग ’ 2019 या इंग्रजी माध्यमाच्या दहा विद्यासंकुलात शिकणार्‍या 2500 आदिवासी मुलांच्या सामूहिक क्रीडा व सांस्कृतिक मोहत्सवात ते बोलत होते.यावेळी ऑल इंडिया फेडरेशनचे हॉकी टीम चे कोच

फिरोज हुसेन शेख यांच्या विशेष उपस्थितीसह,सपोनि तृप्ती सोनावणे, माजी नगरसेविका कल्पना कासुर्डे, मेरी एंजल्सचे संचालक यशवंत पवार, किरण कासुर्डे,असोसिएशनचे राहुल गाडे, उपाध्यक्ष सनी वरूनी, मोहंमद अली खान, स्कॉलर फौंडेशनच्या प्राचार्य सिलीन वायापुल्ली,नितीन प्रभाळे,रमेश बोंबले, संजय पिसाळ, आशुतोष पिसे,आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होतीे.

चव्हाण पुढे म्हणाले,या क्रीडा स्पर्धेतून आम्हास शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत शिक्षण घेणार्‍या या आदिवासी मुलांचं विविध कला गुणांचं कौशल्य फलद्रुप झाल्याचं पहावयास मिळाले आहे.याबद्दल त्यानी नामांकित स्कूल असोशिएशनच्या आयोजकांच विशेष कौतुक केलं.

यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार्‍या ऑल इंडिया हॉकी फेडरेशन चे कोचफिरोज शेख यांनी मुलांना हॉकी तसेच इतर मैदानी खेळविषयी महत्वाच्या टिप्स दिल्या.सदृढ शरीरयष्टीचे महत्व समजावून सांगितले.

सपोनि तृप्ती सोनावणे यांनी दहा शाळांनी एकत्र येऊन आदिवासी मुलांचा सामूहिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनाबाबत संयोजकांचे कौतुक केले. या मुलांच्या अंतर्गत सुप्त गुणांना वाट मोकळी करून देणारा स्तुत्य उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पांचगणीतील आदिवासी मुलांना शैक्षणिक सुविधा देणारी ब्लुमिंग डेल, ब्रिलियंट अकॅडमी,कॅमब्रेज स्कूल, हॅपी अवर्स, मेरी एनजल्स, नॅशनल पब्लिक, स्कॉलर फौंडेशन, शॉलम इंटरनॅशनल स्कूल, सिल्वरडेल स्कुल, विजडंम स्कूल, या दहा शाळा सहभागी झाल्या होत्या.

या प्रत्येक शाळेने मुलांकडून वेगवेगळ्या पद्धतीची ’ऍक्टिव्हिटी’ करून घेतल्या.मुलांचे पेहराव, त्याची वेषभूषा आकर्षक होती. आणि त्यानी सादर केलेले सांस्कृतिक नृत्य यामध्ये सामाजिक विचारांनी अभिप्रेत, शैक्षणिक बेटी बचावो बेटी पढावो, बँक रॉबरी, बटर फ्लाय गेम, नोव्हेलटी डान्स, झुंबा डान्स, लेझीम, मल्हारी डान्स, पिरॅमिड, महाराष्ट्रीय शिवकालीन संस्कृती दर्शन, याच बरोबर 100, 200, 400, रेसिंग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमास जवार, डहाणू, शहापूर, घोडेगाव, प्रकल्प अधिकारी, सहा उपप्रकल्प अधिकारी याच बरोबर स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नामांकित स्कूल असो सदस्य असलेल्या शेखर पाटील, महेंद्र रांजणे, श्रीमती पोतेन, यांनी विशेष परिश्रम घेतले