Your Own Digital Platform

महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहणे काळाची गरज

भणंग ता. जावली येथे महिलांचा सत्कार करताना श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले. शेजारी सौ. समिंद्रा जाधव, सौ. वनिता गोरे, सौ. जयश्री गिरी व इतर
सौ. वेदांतिकाराजे भोसले; भणंग येथील महिला मेळाव्यास प्रतिसाद

सातारा
: भारत हा संस्कृतिप्रधान देश आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात कुटूंबाचा गाडा चालवताना केवळ पुरुषांनी कमवलेल्या पैशांवर क्वचीतच भागत असते. त्यामुळे पुरूषांच्या खांदाला खांदा लावून महिलांनीही नोकरी अथवा छोटे- मोठे उद्योग करुन कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावणे अनिवार्य बनले आहे. आज अनेक महिला मोठमोठ्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनीही स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. देशातील महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर आपला देश महासत्ता निश्चित होईल, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

भणंग ता. जावली येथे स्वयंसिध्दा महिला विकास संस्था आणि भणंग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व्या वित्त आयोग कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप, महिला मेळावा आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या संयुक्त कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करताना सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. वनिता गोरे, जावली पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गिरी, सौ. जयश्री मानकुमरे, मेढा नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. कल्पना जवळ, स्वयंसिध्दा महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. समिंद्रा जाधव, सुलोचना जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या की, मानवाचे आरोग्य जपायचे असेल तर, निसर्गाचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण आणि संवर्धन तसेच प्लॅस्टीकमुक्तीसाठी महिलांनीच स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. याशिवार महिलांनी केवळ चूल आणि मूल यात न अडकता स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहणे ही काळाची गज बनली आहे. त्यामुळे महिलांनी बचत गट असो किंवा वैयक्तीक स्वत: छोटे- मोठे व्यवसाय केले पाहिजेत. तरच कुटूंबाचा गाडा योग्यप्रकारे चालणार आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी हरप्रकारे प्रयत्न करणे आवश्यक असून महिला सबलीकरणासाठी मी नेहमीच हवी ती मदत करणार आहे. आपला देश प्रगतीपथावर नेण्यासाठी, महासत्ता बनवण्यासाठी महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे.

सौ. समिंद्रा जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास मच्छिंद्रनाथ क्षिरसागर, नलिनी जाधव, कुसूम भोसले, रुपाली भिसे, शुभांगी साबळे,कविता धनवडे, स्वाती दिक्षित, वैशाली कोंडे, प्रतिभा पंडीत, हापीजा मोमिन, धनंजय लोहार, शेखर जाधव, प्रकाश जाधव, सुजीत जाधव, नाना टेलर, सुरेश बुवा जाधव, महादेव जाधव, सुहास जाधव, गणेश जाधव यांच्यासह लगि झालं जी या मालिकेतील कलाकार निलिमा कमाने, भणंगचे सरपंच, ग्रामसेवक आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.