Your Own Digital Platform

जनसामान्याचे जिवन समृद्धाकरणारे हे सरकार:शेखर चरेगांवकर

मायणी येथील फुलेनगर परिसरातील साकव पुलाच्या भुमी पुजन प्रसंगी ना.शेखर चरेगावकर व इतर

वडूज: केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हे सामान्य माणसाच्या हिताचे सरकार व जिवन समृद्ध करणारे सरकार असुन या सरकारने जनसामान्यांना शैचालय योजना व जनसामान्यांना 5कोटी महिलांना मोफत गँस योजना व विविध योजना जे माघील सरकारने जे 55वर्षात केले नाही ते भाजप सरकारने 55महिन्यात कामे केली .मायणी व खटाव माण परीसरातील अपुर्ण कामे पुर्ण केल्यानंतर च मी लोकसभा व विधानसभेला मत मागायला तुमच्या दारात येईन असे स्पष्टपणे मत महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.शेखर चरेगांवकर यांनी केले.

मायणी येथील फुलेनगर परिसरातील फुलेनगर ते स्मशानभूमी चांद नदी साकव पुलाच्या भुमी पुजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार डॉ दिलीप राव येळगावकर , युवानेते सचिन गुदगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात तानाजी वायदंडे यांनी ग्रामपंचायत ने विकास कामे सुरू केली असुन जाहीर केलेल्या वचनाम्याप्रमाने डॉ दिलीपराव येळगावकरांच्या प्रयत्नातून सकव पुल मंजुर केला याबद्दल सचिन गुदगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन केले. सर्व दलित समाज यांना भुखंड मिळवून या समाजाला पंतप्रधान योजनेतून अधिक घरकुल मीळावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

आ.डॉ. दिलीपराव येळगावकर म्हणाले ,जाहीरनाम्याप्रमाने आम्ही शब्द पुर्ण केला आहे टेंभू चे पाणी एका महिन्यात तलावात येत आहे सध्याचँनेल गेटचे काम सुरू आहे गावाच्या विकासासाठी आम्ही खंबीर पणे पुर्ण करु अशी ग्वाही दिली.

यावेळी बोलताना युवानेते सचिन गुदगे म्हणाले, जि.प.निवडणुकीत200मतानी अपयश आले परंतु चांगल्यामतानी ग्रामपंचायतीवर आपण सत्ता मिळवली या सतेच्या माध्यमातून20कोटी रुपयांची तरतूद करुन विकास कामे पुर्णतः कडे आहे ग्रामविकास येजनेतुन मा.पंकजा ताई मुंडे यांच्या मुळे पंचायतील विकास साठी 1कोटी25लाखचा निधी मिळवलाआहे आम्ही विकासासाठी स्पर्धा करतो असे सांगितले.

या कार्यक्रमास उपसरपंच सुरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य जगनाथ भिसे,आनंदा शेवाळे, विजय कवडे,सौ.मंदारा पाटोळे, बंडा माळी,अप्पासाहेब भिसे,गणेश भिसे,दिनकर कांबळे, सुदाम भिसे,संजय साठे,सुरेश कुंभार, नंदकुमार कांबळे, तुकाराम पाटोळे, बबनराव घोलप,किशोर खिलारे, अकुशराव भिसे , जालिंदर माळी,धोंडीराम दगडे, ब्रमदेव काटकर,अरुण सकटे,योगेश गायकवाड, अरुण कट्टे तसेच परिसरातील बहुजन समाज बांधव उपस्थित होते .

गणेश भिसे यांनी आभार मानले.