आगवणेंना जीवे मारण्याची धमकी; खंडणीही मागीतली

फलटण: मोबाईल वरून मेसेज करीत दोन वेळा एक लाख रुपयांची खंडणी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अर्वाच्य भाषेत मेसेज (मजकूर) टाकल्याप्रकरणी दिगंबर रोहिदास आगवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत शहर पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार दिगंबर रोहिदास आगवणे हे गिरवी ता.फलटण येथे असताना मंगळवारी दि.29 जानेवारी रोजी मोबाईलवर मॅसेज करुन अर्वाच्च शिवीगाळ करीत एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली याप्रकरणी दिगंबर आगवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष व युवानेते दिगंबर रोहिदास आगवणे (वय 37) रा. गिरवी, ता. फलटण यांना 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मोबाईलवर 7841954800 वरुन टेक्स्ट मॅसेज(मजकूर) आला यावेळी मी सोमनाथ भगवान जाधव आहे माझ्या अकौंटवर पाच दिवसांत एक लाख जमा कर, नाहीतर मरशील असे लिहले होते धनकुडे साहेबांची ऑर्डर आहे.

सदर व्यक्तीने दिगंबर आगवणे यांना बँकेचा अकौंट नंबर व आयएफएससी कोडही पाठवला आहे. त्यानंतर आगवणे यांनी आपण कोणा सोमनाथ जाधव याला पैसे देणे लागत नाही त्यामुळे असा मॅसेज कसा आला? याबाबत पडताळणी करीत असतानाच दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 11.45 वाजता पुन्हा त्याच नंबरवरुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळीचा मॅसेज पाठवून पैसे का पाठविले नाहीत? अशी धमकी देण्यात आली. यानंतर दिगंबर आगवणे यांना कोणीतरी आपल्याला खंडणीसाठी धमकावत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आज दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दिगंबर आगवणे यांना शिवीगाळ व खंडणीसाठी धमकावल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून या बाबतीत पोलीस त्या नंबरचा शोध घेत ती व्यक्ती कोण व कुठली आहे याबाबत अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.